शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
3
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
4
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
5
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
6
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
7
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
8
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
9
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
10
VIDEO : अहमदाबाद प्लेन क्रॅशमध्ये मोठा चमत्कार...! विमानाचे धातूही वितळले, पण 'या' धर्मग्रंथाला साधा स्पर्षही करू शकली नाही आग!
11
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
12
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
13
MLC 2025: भारतीय फलंदाजाचा धुमधडाका! चार चेंडूत मारले चार षटकार, केली तुफान फटकेबाजी
14
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
15
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
16
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
17
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
18
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
19
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
20
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल

दरोडा घालण्याच्या तयारीत असणाऱ्या टोळीस अटक; शस्त्र जप्त 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2019 21:31 IST

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

ठळक मुद्देया माहितीची कल्पना वरिष्ठ अधिकाऱ्यांना देऊन पोलीस उपनिरीक्षक भोयर यांनी पंच व इतर स्टाफ सोबत घेऊन या घटनास्थळावर छापा मारला. या माहितीची कल्पना वरिष्ठ अधिकाऱ्यांना देऊन पोलीस उपनिरीक्षक भोयर यांनी पंच व इतर स्टाफ सोबत घेऊन या घटनास्थळावर छापा मारला. 

यवतमाळ - घातक शस्त्रे बाळगून दरोडा घालण्याच्या तयारीत असणाऱ्या टोळीस स्थानिक गुन्हे शाखेने मध्यरात्री शहरातील गोधणी रोड परिसरातून अटक केली. त्यांच्याकडून शस्त्रे जप्त करण्यात आली असून आरोपींविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सण आणि उत्सवाची शहरात धामधूम असताना कोणतीही अप्रिय घटना घडू नये, यासाठी पोलिसांकडून जागोजागी नाकाबंदी करून सऱ्हाईत गुन्हेगारांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक मंगेश भोयर हे त्यांच्या पथकासह एम.एच.29 - एम.9565 या वाहनाने यवतमाळ शहर परिसरात पेट्रोलिंग करीत होते. या दरम्यान, त्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून काही संशयीत इसम गोधणी रोडवरील जसमीत अपार्टमेंटसमोर तोंडाला रुमाल व गमछे बांधून हातात रॉडसारख्या वस्तू घेऊन संशयास्पद स्थितीत बसलेले आहेत. या माहितीची कल्पना वरिष्ठ अधिकाऱ्यांना देऊन पोलीस उपनिरीक्षक भोयर यांनी पंच व इतर स्टाफ सोबत घेऊन या घटनास्थळावर छापा मारला. यावेळी आरोपी राजू किसन वाघाडे (वय 35), रा. पाटीपुरा, फुकट नगर, यवतमाळ, कृष्ण उर्फ कान्हा मारोती घोसळकर (वय 28), रा. सिंघानिया नगर, यवतमाळ, समीर उर्फ टुप्पी घनश्याम कुसराम (वय 29), रा. सिंघानिया नगर, यवतमाळ, रुपेश उर्फ टावर बाबाराव गजलवार (वय 38), रा. निखील नगर, उमरसरा यवतमाळ आणि सुरज उर्फ लहाण्या गजानन मोहोड (वय 34), रा. मोठे वडगाव, यवतमाळ यांना ताब्यात घेतले. यावेळी सदर आरोपींकडून पोलिसांनी तोंडाला बांधून असलेले गमछे, दोन चाकू, एक खंजर, एक लोखंडी रॉड, एक बांबू काठी, नायलॉन दोरी, मिरची पावडर व एक छ-याची गन असे साहित्य जप्त केले.वरील सर्व आरोपी हे गुन्हेगारी पार्श्वभूचे असल्याचे लक्षात आल्याने व ते दरोडा टाकण्याच्या उद्देशाने पूर्व तयारीत असताना मिळून आल्याने त्यांच्याविरुध्द  अवधूतवाडी पोलीस स्टेशलना कलम 399 भा. दं. वि., सह कलम  4/25 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत. या कारवाई पोलीस अधिक्षक एम. राजकुमार, अपर पोलीस  अधिक्षक नरुल हसन, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप शिरस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मंगेश भोयर, सहाय्यक फौजदार ओमप्रकाश यादव, पोलीस हवालदार गजानन धात्रक, बंडू डांगे, पोलीस नाईक गजानन डोंगरे, किरण पडघण, हरीश राऊत, पोलिस कॉन्स्टेबल सुधीर पिदुरकर, महेश पांडे, गजानन हरणे, सुरेंद्र वाकोडे यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पार पाडली.

टॅग्स :ArrestअटकDacoityदरोडाPoliceपोलिसYavatmalयवतमाळ