पुणे : सिंहगड रोडवरील सहा पेट्रोलपंप लुटण्याच्या इराद्याने एकत्र आलेल्या टोळीतील ५ जणांना सिंहगड रोड पोलिसांनी अटक केली आहे. अमेय सुधाकर मारणे (वय २५, रा. दांडेकर पुल), मंदार श्रीधर दारवटकर (वय २४, रा. वडगाव बुद्रुक), जयेश लक्ष्मण भुरुक (वय २२, रा. घबाडे वस्ती, वडगाव बुदु्रक), राहुल मच्छिंद्र कांबळे (वय २२, रा. माणिकबाग, सिंहगड रोड) आणि ऋतिक संभाजी वाघमारे (वय २१, रा. गोवासी वस्ती, वडगाव बुदु्रक) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांचा एक साथीदार पळून गेला आहे. त्यांच्या ताब्यातून एक गावठी पिस्तुल, एक गावठी सिंगल बोअर कट्टा, एक ऐअर गन, कोयता असा १ लाख ७ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार संजय बरकडे यांनी फिर्याद दिली आहे. वडगाव बुद्रुक येथील दांगट मळा येथे काही तरुण जमले असून त्यांच्याकडे शस्त्र असल्याची माहिती पोलिसांना मिळाली़.त्यावरुन पोलिसांनी सापळा रचून ५ जणांना पकडले. त्यांच्याकडील शस्त्रे जप्त केली. अधिक चौकशीत त्यांनी सिंहगड रोडवरील शहा पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याची तयारी केली होती. पेट्रोलपंपावर दरोडा टाकून परिसरात दहशत निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. पोलीस उपनिरीक्षक एस एस घाडगे अधिक तपास करीत आहे.
सिंहगड रोडवरील पेट्रोल पंप लुटण्याच्या तयारीतील टोळीला अटक; पिस्तुल, सिंगल बोअर कट्टा जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2020 17:10 IST
पेट्रोलपंपावर दरोडा टाकून परिसरात दहशत निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न होता...
सिंहगड रोडवरील पेट्रोल पंप लुटण्याच्या तयारीतील टोळीला अटक; पिस्तुल, सिंगल बोअर कट्टा जप्त
ठळक मुद्दे१ लाख ७ हजार रुपयांचा माल जप्त