शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

शिर्डीमध्ये ताज हॉटेल सुरू करण्याच्या नावे गंडा; कॅनरा बँकेची ३९ कोटींची फसवणूक'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2023 14:20 IST

...त्याकरिता घेतलेल्या कर्जाच्या रकमेची अफरातफर केल्याचा ठपका ठेवत सीबीआयने कंपनी व संचालकांवर गुन्हा दाखल केला आहे. 

मुंबई : शिर्डी येथे ‘द गेट वे हॉटेल’ या फोर स्टार हॉटेलच्या उभारणीसाठी कॅनरा बँकेकडून कर्ज घेत ते बुडवल्याप्रकरणी पुणेस्थित ट्रिलियन रिअल इस्टेट कंपनीविरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. हे फोर स्टार हॉटेल बांधून झाल्यानंतर ताज समुहासोबत ते संलग्न होण्याचा प्रस्ताव होता. मात्र, कंपनीने हॉटेलचे बांधकाम अर्धवटच सोडले. त्याकरिता घेतलेल्या कर्जाच्या रकमेची अफरातफर केल्याचा ठपका ठेवत सीबीआयने कंपनी व संचालकांवर गुन्हा दाखल केला आहे. 

उपलब्ध माहितीनुसार, या फोर स्टार हॉटेलच्या उभारणीसाठी कंपनीने २०१३ ते २०१६ या कालावधीमध्ये कॅनरा बँकेकडून ५५ कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. एप्रिल २०१६ मध्ये हॉटेलचे काम पूर्ण होऊन ते सुरू होणे अपेक्षित होते. मात्र, ते होऊ शकले नाही. दरम्यानच्या काळात कंपनीने कर्जाची परतफेडही न केल्याने कंपनीचे कर्ज खाते ३१ मार्च २०१६ रोजी थकीत कर्ज खाते म्हणून घोषित झाले. याप्रकरणी कॅनरा बँकेला ३९ कोटी रुपयांचा फटका बसला आहे.  फोरेन्सिक ऑडिटमध्ये कंपनीने मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार केल्याची माहिती पुढे आली.  

कॅनरा बँकेने दिलेल्या लेखी तक्रारीच्या आधारे कंपनीचे माजी संचालक सोमनाथ साक्रे, संदीप कोयते, आश्रभ गरड व जया गरड यांच्या विरोधात सीबीआयने गुन्हा नोंदवला आहे. कर्ज प्राप्त रकमेचे पैसे फिरवणे, व्यवहारांच्या बनावट नोंदी तयार करणे,  नियम व अटींचा भंग करणे असे आरोप कंपनीवर ठेवण्यात आले आहेत.

गैरव्यवहार काय?- प्रत्यक्ष कामासाठी ज्या मालाची आवक - जावक झाली व त्यासाठी जो खर्च झाला, त्यावरील बिले व वाहनांचे क्रमांक यामध्ये मोठी तफावत दिसून आली.- काही प्रकरणात तर संबंधित वाहन क्रमाकांची वाहनेच अस्तित्त्वात नसल्याचे आढळून आले. - रंगकाम, अंतर्गत सजावट व फर्निचरसाठी खर्च केल्याचे कंपनीने दाखवले. मात्र, बँक अधिकाऱ्यांनी तांत्रिक पथकासोबत केलेल्या पाहणीच्या दरम्यान बांधकामच अर्धवट असल्याचे आढळून आले. - याखेरीज, कंपनीने कर्जापोटी दिलेल्या एकूण ८५ टक्के रकमेचा वापर केल्याचे दिसून आले. मात्र, त्या प्रमाणात काम झाले नसल्याचे या पथकाला आढळून आले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीhotelहॉटेलbankबँक