मद्यप्राषन करून वाहन चालविणारा गजाआड, सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला
By सचिन राऊत | Updated: September 23, 2022 17:30 IST2022-09-23T17:30:17+5:302022-09-23T17:30:43+5:30
वाहतुक शाखेने केली कारवाई

मद्यप्राषन करून वाहन चालविणारा गजाआड, सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला
अकाेला: अशाेक वाटिका चाैक परिसरातून बेधुंद तसेच वेडीवाकडी दुचाकी चालविणारा युवक अपघात करण्याचा धाेका असल्याचे लक्षात येताच वाहतुक पाेलिसांनी त्याचा पाठलाग करीत या युवकास शुक्रवारी दुपारी ताब्यात घेतले़ त्याची वैद्यकीय तपासणी केली असता प्रचंड मद्यप्राषन करून वाहन चालवीत असल्याचा अहवाल वैद्यकीय तज्ज्ञांनी देताच राजनखेड येथील रहीवासी असलेल्या युवकाविरुध्द सिटी काेतवाली पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यास अटक केली.
बार्शिटाकळी तालुक्यातील राजनखेड येथील रहिवासी असलेला गाेपाल दिनकर घुगे हा युवक एम एच ३० एस ८४२२ क्रमांकाची भरधाव चालवीत असून वेडीवाकडी चालवीत असल्याचे अशाेक वाटीका चाैकात कर्तव्यावर असलेले वाहतुक पाेलिस राजेश दुबे व श्रीकृष्ण गायकवाड यांच्या लक्षात आले़ या दुचाकीचालकाकडून अपघाताचा धाेका असल्याचे या दाेन्ही पाेलिसांच्या निदर्शनास येताच त्यांनी तातडीने या युवकाचा पाठलाग करून अडवीले़ त्याची ब्रीथ अॅनालायझरव्दारे तपासणी केली असता ताे मद्यप्राषन करून असल्याचे समाेर आले़ मात्र त्यानंतर पाेलिसांनी त्याची शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वाेपचार रुग्णालयात तपासणी केली असता ताे यथेच्छ मद्यप्राषन करून असल्याचे समाेर आले़ त्यानंतर या युवकाविरुध्द सिटी काेतवाली पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.