इराणी वस्तीतून ड्रग्ज लेडी गजाआड; खडकपाडा पोलिसांची कारवाई 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2023 08:46 IST2023-05-25T08:46:08+5:302023-05-25T08:46:20+5:30

आंबिवली येथील इराणी वस्तीत एक महिला एमडी आणि चरस विक्री करत असल्याची माहिती खडकपाडा पोलिसांना मिळाली होती.

Gajaad, the drug lady from the Iranian settlement; Khadakpada police action | इराणी वस्तीतून ड्रग्ज लेडी गजाआड; खडकपाडा पोलिसांची कारवाई 

इराणी वस्तीतून ड्रग्ज लेडी गजाआड; खडकपाडा पोलिसांची कारवाई 

लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : आंबिवली येथील इराणी वस्तीतून एमडी आणि चरस विकणाऱ्या ड्रग्ज लेडीला खडकपाडा पोलिसांनी अटक केली आहे. सबा सय्यद असे तिचे नाव आहे. पोलिसांनी तिच्याकडून एमडी आणि चरस जप्त केले आहे. 

आंबिवली येथील इराणी वस्तीत एक महिला एमडी आणि चरस विक्री करत असल्याची माहिती खडकपाडा पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे पोलिसांनी मंगळवारी रात्री इराणी वस्तीत छापा टाकला. तेथून एका महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले. तिची चौकशी केली असता, तिच्याकडे एमडी आणि चरस सापडले.  ती इराणी वस्ती परिसरात नशेबाजांना एमडी आणि चरसची विक्री करत होती. तिला हे अमली पदार्थ कोण पुरवत होते, याचा पोलिस तपास करत आहेत.

गुन्हेगारांचे वास्तव्य असलेली वस्ती
इराणी वस्तीत यापूर्वी पोलिसांनी अनेक कारवाया केल्या असून, यापूर्वी अनेक चोरटे आणि सराईत गुन्हेगारांना येथून अटक करण्यात आली आहे. तसेच कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर वस्तीतील लाेकांकडून प्राणघातक हल्लेही झाले हाेते.

Web Title: Gajaad, the drug lady from the Iranian settlement; Khadakpada police action