शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

संजय पांडेंच्या नियुक्तीचे भवितव्य आज ठरणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2021 08:32 IST

पोलीस महासंचालकपदी पूर्ण वेळ नियुक्तीसाठी यूपीएससी समितीची बैठक . सीबीआयचे संचालक सुबोध जायसवाल यांनी  महाराष्ट्र पोलीस प्रमुखपद सोडल्यानंतर ८ महिन्यांनी म्हणजे १ सप्टेंबरला समितीची बैठक झाली होती.

- जमीर काझीलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : गेल्या ७ महिन्यांपासून महाराष्ट्र पोलीस दलाची धुरा सांभाळणाऱ्या संजय पांडे यांचे पोलीस महासंचालक पदाबाबतचे भवितव्य सोमवारी निश्चित होणार आहे.  महाराष्ट्र  डीजीपीसाठी नावे निश्चितीसाठीची विविध कारणांमुळे रेंगाळलेली  केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) निवड समितीची बैठक सोमवारी दिल्लीत होत आहे. यात तीन जणांच्या यादीत त्यांची निवड झाल्यास पूर्णवेळ पदासाठीचा त्यांचा मार्ग मोकळा होईल. अन्यथा मागच्या वेळीप्रमाणे अपात्र ठरविल्यास राज्य सरकारला  अन्य पर्याय शोधावा लागेल. 

सीबीआयचे संचालक सुबोध जायसवाल यांनी  महाराष्ट्र पोलीस प्रमुखपद सोडल्यानंतर ८ महिन्यांनी म्हणजे १ सप्टेंबरला समितीची बैठक झाली होती. मात्र त्यामध्ये प्रतिनियुक्तीवर त्यांचे व रश्मी शुक्ला यांची नावे वगळली तरी ‘डीजीपी’साठी इच्छुक नसल्याबद्दल त्यांचे म्हणणे ऐकून घेतलेले नसल्याने ही बैठक पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर आता १ नोव्हेंबरला  ही बैठक होत आहे. 

सर्वोच्च न्यायालयाने प्रकाश सिंग खटल्याचा निकालावेळी डीजीपीच्या नियुक्तीसाठी  निर्देश दिले आहेत. त्यानुसार या पदासाठी राज्य सरकारकडून  यूपीएससीची निवड समितीकडे प्रस्ताव सादर करावयाचा आहे. त्यांनी निश्चित केलेल्या तीन जणांपैकी एकाची निवड राज्य सरकार करू शकते. जायसवाल ७ जानेवारीला कार्यमुक्त झाल्यानंतर १७ मार्चपर्यंत हेमंत नगराळे तर ९ एप्रिलपर्यत रजनीश सेठ यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार होता. तर १० एप्रिलपासून पांडे यांच्याकडे कार्यभार आहे. पूर्णवेळ नियुक्तीसाठी त्यानुसार राज्य सरकारने या पदासाठी ३० वर्षे किंवा त्याहून अधिक सेवा झालेल्या राज्यात सेवेत असलेल्या १९ जणांची नावे पाठविली आहेत.

अतिरिक्त कार्यभाराचा पर्याय कायमnनिवड समितीने जरी पांडे यांचे नाव वगळून अन्य ३ नावे सुचवली तरी राज्य सरकार त्यांच्याकडे सध्याप्रमाणे अतिरिक्त कार्यभार ठेवू शकते. ते पुढच्या वर्षी ३० जूनला निवृत्त होत आहेत.  nयूपीएससीच्या निवड समितीने २०१९ मध्ये जायसवाल यांच्या नियुक्तीवेळी  पांडे हे सेवा ज्येष्ठतेनुसार द्वितीय स्थानी होते. मात्र समितीने त्यांच्या ‘एसीआर’बद्दल आक्षेप नोंदवित संजय बर्वे व बिपिन बिहारी यांची नावे सुचविली होती.

टॅग्स :PoliceपोलिसMaharashtraमहाराष्ट्र