मुंबई - वरळीतील वी. पी. नगर येथे शॉर्ट सर्किटने आज सकाळी आग लागली. त्यानंतर हि आग पसरत पसरत सिलेंडरपर्यंत पोहचली. त्यानंतर अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोचले आणि त्यांनी शर्थीचे प्रयत्न करून आग विझवली. इतकी मोठ्या प्रमाणावर ही आग दुकानात लागलेल्या शॉर्ट सर्किटमुळे लागली. शॉर्ट सर्किटची आग सिलेंडरपर्यंत पोहचल्याने सिलेंडरचा स्फोट झाला आणि आगीने भीषणरूप धारण केले. मात्र, या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
वरळीत सिलेंडर स्फोटामुळे भीषण आग
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2018 14:39 IST