शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

"हॅलो, माझी सून हॉटेलच्या ४४३ रुममध्ये…"; सासऱ्याने टीप दिली अन् पोलिसांनी धाड टाकताच...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 10:08 IST

सासऱ्याने दिलेल्या माहितीनंतर गुजरात पोलिसांनी मद्य पार्टी करणाऱ्या सूनेला अटक केली.

Gujarat Liqueur Party Raid:गुजरातमध्ये दारूबंदी असतानाच, सुरतमध्ये एक दारू पार्टी पकडण्यात आली आहे. सुरतमधील डुमास येथील वीकेंड अॅड्रेस हॉटेलच्या रूम नंबर ४४३ मध्ये दारू पार्टी सुरू होती. पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला आणि चार पुरुष आणि दोन महिलांना पकडले. हे लोक दारू पार्टी करत होते. पण सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे येथे दारू पार्टी करणाऱ्या महिलेच्या सासऱ्याने पोलिसांना याची माहिती याची दिली आणि सर्वांना पकडवून दिलं. सासऱ्याने पोलिसांना फोन करुन सगळा प्रकार सांगितला.

पतीशी झालेल्या भांडणानंतर, एक पत्नी तिच्या मित्रांसोबत पार्टी करत होती. फ्रेंडशिप डेच्या दिवशी हॉटेलच्या खोलीत मित्रांसोबत दारूची पार्टी करत होती. पण तिला माहित नव्हते की तिचा फ्रेंडशिप डे साजरा करणे लवकरच एका गुन्ह्यात ठरेल. गुजरातमधील डुमास येथील वीकेंड अॅड्रेस हॉटेलवर पोलिसांनी छापा टाकला. छाप्यानंतर हॉटेलच्या एका खोलीत ४ पुरुष आणि २ मुली दारूची पार्टी करत होते. यानंतर, सर्वांना अटक करण्यात आली.

पोलिसांनी हॉटेलमधून २३ ते २५ वयोगटातील चार पुरुष आणि दोन मुलींना अटक केली. हे सर्वजण हॉटेलच्या खोलीत दारूची पार्टी करत होते. पार्टी करणाऱ्या महिलांपैकी एकीच्या सासऱ्यांनी पोलिसांना ही माहिती दिली. होते. सासऱ्यानेच त्यांची सून हॉटेलमध्ये तिच्या मैत्रिणींसोबत दारू पार्टी करत असल्याची माहिती दिली. सासऱ्याने सुरत पोलिस नियंत्रण कक्षाला फोन करून सांगितले की त्यांची सून हॉटेलच्या रूम नंबर ४४३ मध्ये दारू पार्टी करत आहे. त्यानंतर डुमास पोलिसांनी छापा टाकून महिलेला दारूच्या बाटल्यांसह पकडले. अटक केलेल्या दोन्ही मुली कलाकार आहेत, तर चारही पुरुष व्यावसायिक आहेत.

हॅलो... पोलिस नियंत्रण कक्ष! साहेब... माझी सून एका हॉटेलमध्ये दारूची पार्टी करत आहे. तिला थांबवा, असं सासऱ्याने पोलिसांना सांगितलं होतं. पोलिसांनी सांगितले की, जेव्हा छापा टाकला तेव्हा सर्व आरोपी दारूच्या नशेत होते. पोलिसांनी चार ग्लास आणि दारूची अर्धी भरलेली बाटली जप्त केली. आरोपींनी फ्रेंडशिप डे साजरा करण्यासाठी हॉटेलची खोली भाड्याने घेतली होती. पोलिसांनी सर्वांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेले आणि त्यांची रक्त तपासणी केली तेव्हा त्यांच्या रक्तामध्ये  अल्कोहोल असल्याचे आढळून आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फोन करणाऱ्याच्या सुनेचा तिच्या पतीशी काही वाद होता. तिचे तिच्या पतीशी पटत नव्हते. म्हणून सासरच्यांनी त्यांच्या सुनेला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला. त्यांनी त्यांच्या सुनेचा पाठलाग केला आणि नंतर त्यांना दारू पार्टीची माहिती पोलिसांना दिली. पार्टीची माहिती मिळताच त्यांनी पोलिसांना फोन केला.

टॅग्स :GujaratगुजरातCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस