शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
2
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
3
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
4
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
5
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
6
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
7
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
8
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
9
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
10
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
11
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
12
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
13
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...
14
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
15
२०,५००% रिटर्न! बिहारच्या या कंपनीनं ५ वर्षांत ₹१ लाखांचे केले ₹२ कोटी, तुमच्याकडे आहे का?
16
Amit Shah: विक्रमी अमित शाह! 'अशी' कामगिरी करणारे पहिलेच गृहमंत्री, अडवाणींनाही टाकले मागे
17
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
18
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
19
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
20
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...

"हे माझ्या कर्माचं फळ’’, पत्र लिहून महिला पोलीस सब-इन्स्पेक्टरची आत्महत्या

By बाळकृष्ण परब | Updated: January 2, 2021 11:17 IST

Women Police Suicide News : सदर महिला पोलीस इन्स्पेक्टर एका घरात भाडेकरू म्हणून राहत होत्या. तिथेच त्यांनी गळफास घेत जीवन संपवले

ठळक मुद्देआरजू पवार असे या महिला पोलीस सब-इन्स्पेक्टरचे नाव त्यांनी फंख्याला गळफास लावून आत्महत्या केलीआरजू पवार या २०१५ च्या बॅचच्या सब इन्स्पेक्टर होत्या. त्या शामली येथील रहिवासी होत्या

बुलंदशहर (उत्तर प्रदेश) - हे माझ्या कर्माचे फळ आहे, असा उल्लेख असलेली चिठ्ठी लिहून उत्तर प्रदेश पोलीस दलातील एका महिला सब इन्स्पेक्टरने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरजू पवार असे या महिला पोलिसाचे नाव असून, त्यांनी फंख्याला गळफास लावून आत्महत्या केली.ही घटना उत्तर प्रदेशमधील बुलंदशहर येथील अनूप शहर पोलीस ठाणे क्षेत्रात घडली. सदर महिला पोलीस इन्स्पेक्टर एका घरात भाडेकरू म्हणून राहत होत्या. तिथेच त्यांनी गळफास घेत जीवन संपवले. या प्रकारामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ७ वाजता घरमालकाने जेवणासाठी विचारणा केली असता तिने काही वेळात येणार असल्याचे सांगितले. मात्र बराच वेळ होऊनही त्या न आल्याने घरमालकाने खोलीत डोकावून पाहिले असता तिथे त्यांनी गळफास लावल्याचे दिसून आले. त्यानंतर घरमालकाने सदर प्रकाराची माहिती पोलिसांना दिली.आरजू पवार या २०१५ च्या बॅचच्या सब इन्स्पेक्टर होत्या. त्या शामली येथील रहिवासी होत्या. त्यांच्या खोलीमधून एक पत्र मिळाले आहे. त्यामध्ये आरजू पवार यांनी त्यात हे माझ्या कर्माचे फळ आहे, असे लिहिलेले दिसून आले. मात्र पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.याबाबत एसएसपी संतोष कुमार सिंह यांनी सांगितले की, आज महिला पोलीस सब इन्स्पेक्टर आरजू पवार यांनी आत्महत्या केली. आता या संपूर्ण प्रकरणाची तपासणी सुरू आहे. घटनास्थळावरून दोन ओळींचे पत्र जप्त करण्यात आले आहे. ज्यामध्ये त्यांनी आपल्या मृत्यूसाठी स्वत:लाच जबाबदार ठरवले आहे. मात्र या संपूर्ण प्रकरणाच पुन्हा एकदा गंभीरपणे तपास करण्यात येत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेश