शहरं
Join us  
Trending Stories
1
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
2
IND vs WI: भारताचा कसोटी संघ जाहीर! पडीक्कलला संधी; श्रेयस अय्यर, करूण नायरला वगळले
3
'शेतकऱ्यांना मदतीसाठी पंचांग पाहणार का?'; उद्धव ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
4
समोर मृत्यू आला पण त्यांनी संघर्ष निवडला; गुराख्याने परतवला वाघ आणि बछड्यांचा हल्ला
5
पंतप्रधान मोदी आणि नेतन्याहू यांच्या मैत्रीवरून सोनिया गांधींनी उपस्थित केला सवाल, म्हणाल्या...
6
AI बिनधास्त वापरा, पण त्याआधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा! नाहीतर स्वतःच अडचणीत सापडाल
7
५ राशींवर दुर्गा देवीची कायम लक्ष असते, लाभते विशेष कृपा; हाती राहतो पैसा, शुभ-कल्याण-भरभराट!
8
कोळशांच्या खाणीतून काय बाहेर पडले? भारतीय शास्त्रज्ञही चकीत झाले...! युरेनियमचा अजस्त्र साठा सापडला
9
सेन्सेक्सलाही टाकले मागे! सरकारी कंपनीचा शेअर महिन्यात ४०% नी वधारला; तेजीचे कारण काय?
10
लेक राहासाठीही आहे वेगळी व्हॅनिटी व्हॅन, आलियाचा प्रश्न ऐकून महेश भटही झाले शॉक
11
भयावह! "आमची कबर इथेच..."; गाझामध्ये ३ मुलींसह अडकलेल्या आईची मन सुन्न करणारी गोष्ट
12
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार हवा, पण अर्धी अमेरिकाच नाखूश! सर्वेक्षणात झाला धक्कादायक खुलासा 
13
IND vs PAK: 'इतका राग होता तर खेळलाच कशाला?' हस्तांदोलन न करण्यावर शशी थरूर संतापले!
14
शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव का मिळत नाही? नितीन गडकरी यांनी कारण सांगितले
15
वाढीव मदतीचा प्रस्ताव कॅबिनेटसमोर मांडू; मंत्री मकरंद पाटील यांचे शेतकऱ्यांना आश्वासन
16
भाजपाच्या अध्यक्षपदासाठी नाव आघाडीवर, कशी असेल पुढची वाटचाल? फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
17
भगवा कुर्ता, कपाळी भस्म; संजय दत्तने घेतलं महाकालेश्वरचं दर्शन, भक्तीत तल्लीन झाला अभिनेता
18
'रशियाचे लष्कर कागदी वाघासारखेच'; डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना डिवचले, रशियानेही केला पलटवार
19
कारगिल युद्धावेळीही आपण पाकिस्तानसोबत..., हस्तांदोलन वादावरून शशी थरूर यांनी दिला टीम इंडियाला सल्ला

सिम स्वॅपिंगद्वारे स्क्रॅप व्यावसायिकाला ४ लाख ८९ हजारांना गंडा,चंदननगर पोलिस ठाण्यात तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2020 16:39 IST

एअरटेल कंपनीतून आहे. तुमचा इंटरनेट पॅक आज संपणार आहे.पण बाहेर लॉकडाऊन असल्याने आम्ही आॅनलाईन रिचार्ज करुन देतो..

ठळक मुद्देजानेवारी ते जूनपर्यंत सिम स्वॉपिंग आणि कार्ड क्लोनिंगच्या १९८ तक्रारी

पुणे : सिम स्वॅपिंगच्या माध्यमातून सायबर चोरट्यांनी एका स्क्रॅप व्यावसायिकाच्या कार्ड दुसऱ्या कार्डवर ट्रान्सफर करुन तब्बल ४ लाख ८९ हजार रुपयांना गंडा घातला. याप्रकरणी कमलेश प्रकाशचंद जैन (वय ३८, रा. गिरगाव रोड, मुंबई) यांनी चंदननगर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. हा प्रकार खराडी येथील तनिषक अपार्टमेंटमध्ये फिर्यादी असताना २३ व २४ जुलै दरम्यान आॅनलाईनद्वारे घडला.

सायबर चोरट्याने फिर्यादी जैन यांच्या मोबाईलवर संपर्क साधला.त्यांना एअरटेल कंपनीतून बोलत असल्याची बतावणी केली. तुमचा इंटरनेट पॅक आज संपणार आहे, असे सांगून बाहेर लॉकडाऊन असल्याने आम्ही आॅनलाईन रिचार्ज करुन देतो, असे सांगितले. सुरुवातीला जैन यांनी त्याला नकार दिला. तेव्हा सायबर चोरट्याने त्यांना तुम्ही रिचार्ज केले नाही तर तुमचे सिमकार्ड बंद होईल, असे सांगून घाबरविले.त्यानंतर त्यांना मोबाईलमधील एअरटेल थँक्स या अ‍ॅपमधून १० रुपयांचे रिचार्ज करण्यास भाग पाडले. त्यानंतर दुपारी पुन्हा फोन करुन त्यांना रिचार्ज झाले असल्याचे खोटेच सांगितले. त्यावरुन जैन यांचा त्याच्यावर विश्वास बसला. त्यानंतर जैन यांच्या मोबाईलवर एक टेक्स्ट मेसेज पाठवून, तो १२१  नंबरवर पाठविण्यास सांगितला. त्याप्रमाणे जैन यांनी करताच त्यांचा मोबाईल बंद झाला. व त्यांच्या सिमकार्डचा एक्सेस सायबर चोरट्यांकडील सिमकार्डकडे गेले. त्यानंतर चोरट्याने दुपारी १ ते २ या एका तासाच्या दरम्यान जैन यांच्या एचडीएफसी बँक खात्यामधून फोन पे व पेटीएमच्या माध्यमातून ४ लाख ८९ हजार ९३५ रुपये ऑनलाईन ट्रान्सफर करुन फसवणूक केली. .......जून अखेर १९८ तक्रारीमोबाईलधारकांना मेसेज पाठवून तो मेसेज १२१ क्रमांकावर फॉरवर्ड करायला सांगतात. त्यामुळे मोबाईलधारकाच्या सिम कार्डचा एक्सेस हा सायबर चोरट्यांकडे जातो. तो मोबाईल तुमच्या बँक खात्याशी लिंक असेल तर सिम कार्डबरोबरच बँक खात्याची माहिती सायबर चोरट्यांकडे जाते व त्या आधारे सायबर चोरटे तुमचे सर्व बँक खाते रिकामे करतात. जानेवारी ते जून अखेरपर्यंत अशा प्रकारचे सिम स्वॉपिंग आणि कार्ड क्लोनिंग करुन १९८ मोबाईलधारकांची फसवणूक झाली असल्याच्या तक्रारी सायबर पोलिसांकडे आल्या आहेत. याशिवा गेल्या वर्षीच्या तब्बल १३८ तक्रारीची तपास प्रलंबित आहे.अशाप्रकारे जूनअखेर तब्बल ३३६ तक्रारी सायबर पोलिसांकडे आल्या आहेत.

टॅग्स :Puneपुणेchandan nagar policeचंदननगर पोलीसcyber crimeसायबर क्राइमfraudधोकेबाजी