शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

गुरुग्राम ते मध्यप्रदेश! पोलिसांपासून वाचण्यासाठी आरोपीचा तब्बल 400 किमी पायी प्रवास, अखेर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2023 11:14 IST

आरोपी गुरुग्रामपासून 400 किमी अंतरावर असलेल्या मध्य प्रदेशात पायीच पोहोचला, त्यामुळे पोलिसांना त्याचे लोकेशन ट्रेस करता आले नाही

हरियाणातील गुरुग्राम पोलिसांनी तीन वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून 9 महिन्यांपासून फरार असलेल्या तरुणाला अटक केली आहे. जानेवारी महिन्यात आरोपीविरुद्ध बादशाहपूर पोलीस ठाण्यात पॉक्सो कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला होता. आरोपीला पकडण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागल्याचे पोलिसांनी सांगितले. कारण तो पोलिसांपासून वाचण्यासाठी चतुराईने पावलं टाकत होता. 

बलात्कार केल्यानंतर आरोपी गुरुग्रामपासून 400 किमी अंतरावर असलेल्या मध्य प्रदेशात पायीच पोहोचला, त्यामुळे पोलिसांना त्याचे लोकेशन ट्रेस करता आले नाही. गुरुग्रामचे एसीपी प्रियांशू दीवान यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ड्रे उर्फ ​​गोविंद हा मध्य प्रदेशातील नरसिंहपूर जिल्ह्यात मजूर म्हणून काम करत होता. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी तेथे छापा टाकून त्याला अटक केली. आरोपी हा मोस्ट वाँटेड गुन्हेगार आहे. त्याच्यावर 5 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. 

चौकशीत आरोपीने सांगितले की तो गुरुग्राममध्ये मजूर म्हणून काम करत असे आणि तेथील झोपडपट्टीत राहत होता. 12 जानेवारी रोजी शेजारी राहणाऱ्या तीन वर्षीय मुलीचे वडील कामावर गेले असता संधी साधून त्याने तिच्यावर बलात्कार केला आणि पळून गेला. पोलिसांपासून वाचण्यासाठी तो गुरुग्राम येथून पायी चालत 400 किमी अंतरावर असलेल्या मध्य प्रदेशातील नरसिंहपूर जिल्ह्यात असलेल्या बरभान गावात पोहोचला. तिथे राहून मजूर म्हणून काम करू लागला. मात्र पोलिसांनी त्याला शोधून काढले.

चौकशीत आरोपीने सांगितले की, त्याला पोलिसांपासून पळून जायचे होते. त्यामुळे गावी पायी जायचं ठरवलं. संपूर्ण प्रवासात कोणत्याही सार्वजनिक वाहतुकीत चढलो नाही. आरोपीला न्यायालयात हजर केले जाणार असल्याचे गुरुग्राम पोलिसांनी सांगितले. पुढील तपासासाठी न्यायालयाकडून कोठडीची मागणी करण्यात येणार आहे.

एसीपी दीवान म्हणाले की, गुरुग्राम आणि फरीदाबाद व्यतिरिक्त मध्य प्रदेशातही आरोपींविरुद्ध 2 एफआयआर नोंदवले आहेत. 2020 मध्ये आरोपी ड्रे याने फरीदाबादमध्ये पत्नीवर जीवघेणा हल्ला केला होता. त्यानंतर पोलिसांनी कलम 307 अन्वये एफआयआर नोंदवून त्याला अटक केली होती, परंतु न्यायालयात हजर होत असताना तो फरार झाला होता. त्याच्यावर मध्य प्रदेशात वाद आणि मारहाणीचे गुन्हे दाखल आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस