शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

मैत्री, प्रेम आणि...; नगरला ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकला ‘क्लास वन’ अधिकारी, ३ कोटींच्या खंडणीची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2021 05:26 IST

जखणगाव येथील बंगल्यात एकटीच राहणारी आरोपी महिला ही आधी श्रीमंत व्यक्तींशी मैत्री करायची. त्यानंतर त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून शरीरसुखाचे आमिष दाखवायची

अहमदनगर : नगर तालुक्यातील जखणगाव येथे सेक्स रॅकेट चालविणाऱ्या महिलेच्या ‘हनी ट्रॅप’मध्ये नगर शहरात नोकरी करणारे एक ‘क्लास वन’ अधिकारीही अडकल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात मंगळवारी सदर महिलेसह तिच्या चार साथीदारांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

याप्रकरणी पीडित अधिकाऱ्यानेच फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी मुख्य आरोपी महिलेसह तिचे साथीदार सचिन खेसे, अमोल मोरे, महेश बागले व सागर खरमाळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करत खेसे याला अटक केली. आरोपी महिला व अमोल मोरे यांना पोलिसांनी आधीच दाखल झालेल्या गुन्ह्यात १५ मे रोजी अटक केलेली आहे.

जखणगाव येथील बंगल्यात एकटीच राहणारी आरोपी महिला ही आधी श्रीमंत व्यक्तींशी मैत्री करायची. त्यानंतर त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून शरीरसुखाचे आमिष दाखवायची. समोरचा व्यक्ती महिलेच्या आमिषाला बळी पडला की, या टोळीचे पुढील नियोजन ठरलेले असायचे. 

अधिकाऱ्याला वारंवार ब्लॅकमेलआरोपी महिलेने सदर अधिकाऱ्यास १ मे रोजी दुपारी तिच्या जखणगाव येथील बंगल्यात बोलावून घेत शरीरसंबंध करण्यास भाग पाडले. यावेळी तिच्या साथीदारांनी त्याचे व्हिडिओ चित्रीकरण करत या अधिकाऱ्यास ‘तीन कोटी रुपये आणून दे, नाहीतर हा व्हिडिओ पोलिसांना दाखवून तुझ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करेन’, अशी धमकी दिली. यावेळी अधिकाऱ्याच्या वाहनात असलेले ३० हजार रुपये तसेच ऑनलाईन ५० हजार रुपये जबरदस्तीने घेण्यात आले. त्यानंतरही ही महिला या अधिकाऱ्याला ब्लॅकमेल करून वारंवार ३ कोटी रुपये देण्याची मागणी करत होती.

सदर महिला व तिच्या साथीदारांविरोधात गुन्हा दाखल असून या अनुषंगाने महत्त्वाचे पुरावे मिळालेले आहेत. अशा पद्धतीने आरोपींनी ज्यांच्याकडे खंडणी मागितली आहे, त्यांनी पोलिसांकडे तक्रार करावी.    - राजेंद्र सानप, तपास अधिकारी

तिच्या मोबाइलमध्ये ‘ते’ व्हिडीओश्रीमंतांना ब्लॅकमेल करण्यासाठी आरोपी महिला व तिच्या साथीदारांनी तयार केलेले व्हिडिओ पोलिसांना आरोपींच्या मोबाइलमधून मिळाले आहेत. हनीट्रॅप प्रकरणात या गुन्ह्यात आणखी आरोपी वाढण्याची शक्यता असून त्या दृष्टीने पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स :Policeपोलिसhoneytrapहनीट्रॅप