शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

फेसबुकवरची मैत्री कमिशनच्या आमिषाने पडली महागात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2021 16:13 IST

Fraud Case : महिलेने दागिने गहाण ठेऊन दिले ४ लाख 

ठळक मुद्दे५ जुलै रोजी त्याने तिला कॉल करून दिल्ली विमानतळावर आपणास कस्टमच्या अधिकाऱ्यांनी पकडले असून माझ्याकडे भारतीय चलन नसल्याने ५० हजार त्वरित पाठवा सांगितले.

मीरारोड - भाईंदरच्या महिलेने फेसबुक वरून केलेली मैत्री आणि लंडनच्या त्या कथित मित्राने ५ लाख युरो डॉलरची जमीन खरेदीत दिलेल्या कमिशनच्या आमिषाला बळी पडलेल्या त्या महिलेची ४ लाखांना फसगत झाली. त्यासाठी तिला स्वतःचे दागिने गहाण ठेवावे लागले. 

भाईंदर पूर्वेला न्यू गोल्डन नेस्ट भागात राहणाऱ्या वैशाली मनीष राजा यांची फेसबुकवर जॉन्सन मायलो या स्वतःला लंडनचा रहिवासी व अभियंता म्हणवणाऱ्याशी मैत्री झाली . दोघांची फेसबुक व नंतर व्हॉट्सएप वरून चॅटिंग सुरु झाले. त्याने ५ जुलै रोजी भारतात येणार सांगत तसे तिकीट पाठवले व आपण ५ लाख युरो डॉलरची जमीन खरेदी करणार असून त्यातले कमिशन तुम्हाला देईन असे सांगितले. 

५ जुलै रोजी त्याने तिला कॉल करून दिल्ली विमानतळावर आपणास कस्टमच्या अधिकाऱ्यांनी पकडले असून माझ्याकडे भारतीय चलन नसल्याने ५० हजार त्वरित पाठवा सांगितले. त्यानुसार बँक खात्यातून तिने ५० हजार पाठवले. त्याने नंतर परत कॉल करून आणखी साडे तीन लाख मागितले. त्यासाठी तिने स्वतःचे मंगळसूत्र , चैन, कडा व हार असे दागिने सराफा कडे गहाण ठेवत ते पैसे बँक खात्याद्वारे पाठवले. 

काही वेळाने त्याने पुन्हा कॉल करत आणखी १५ लाखांची मागणी केली . पैसे दिले नाहीस तर मला जेल मध्ये टाकतील व मी मरेन. पण आपले शेवटचे संभाषण असल्याने त्याला तू जबाबदार असशील असा कांगावा त्याने केला . तिने कोणते पोलीस आहेत माझ्याशी बोलणे करून दे सांगितल्यावर ते त्याने टाळले . अखेर फसवणूक झालेल्या वैशाली ने १९ ऑक्टोबर रोजी नवघर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यावर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे .

टॅग्स :Facebookफेसबुकfraudधोकेबाजीmira roadमीरा रोडPoliceपोलिसGoldसोनं