शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

फुकट बिअर दिली नाही; बार व्यवस्थापकाला टोळक्याची मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2021 18:49 IST

Beaten Bar Manager By Gang :विशेष बाब म्हणजे मारहाण करणा-या टोळक्याने व्यवस्थापकाच्या गळयातील सोन्याच्या चेन सह रेस्टॉरंटमधील सीसीटिव्हीचे डिव्हीआर आणि काउंटरमधील 76 हजाराची रोकड लंपास केल्याची तक्रार मानपाडा पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे.

डोंबिवली: शिवी देऊ नका असे सांगणा-या डिलीव्हरी बॉयला हॉटेलमध्ये घुसून चौघांनी मारहाण केल्याचा प्रकार मागील आठवडयात  पश्चिमेकडील गुप्ते क्रॉस रोडवरील प्रिती रेस्टॉरंट या हॉटेलात घडला असताना शनिवारी रात्री 12 वाजता पुर्वेकडील खंबाळपाडा परिसरातील फोर सिजन बार अॅण्ड रेस्टॉरंटमध्ये बीअर फुकट दिली नाही म्हणून व्यवस्थापकाला गंभीर मारहाण केल्याची घटना घडली.

विशेष बाब म्हणजे मारहाण करणा-या टोळक्याने व्यवस्थापकाच्या गळयातील सोन्याच्या चेन सह रेस्टॉरंटमधील सीसीटिव्हीचे डिव्हीआर आणि काउंटरमधील 76 हजाराची रोकड लंपास केल्याची तक्रार मानपाडा पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे.या मारहाणीत बार रेस्टॉरंटचे व्यवस्थापक नित्यानंद भंडारी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. भंडारी यांच्या तक्रारीवरून दिपेश म्हात्रे, विनायक पाटील याच्यासह त्यांच्या अन्य साथीदारांवर मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मारहाण करणारे दुचाकीवरून आले होते. त्यांनी भंडारी यांच्याकडे फुकट बीअर मागितली. बीअर दिली नाही या रागातून दिपेश, विनायक आणि त्यांच्या सहका-यांनी हाताने आणि लाथाबुक्यांनी भंडारी यांना मारहाण केली. कॅश काउंटरवरील संगणकाचीही यावेळी तोडफोड करण्यात आली. सीसीटिव्हीचे डिव्हीआर आणि काउंटरमधील 76 हजाराची रोकड चोरून नेली. मारहाण करताना भंडारी यांच्या गळयातील सोन्याची चेन खेचली आणि जीवे मारण्याची धमकी देत त्यांनी मारहाण केली. या घटनेप्रकरणी रविवारी दुपारी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीdombivaliडोंबिवलीPoliceपोलिसcctvसीसीटीव्ही