शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

१६१ कोटींच्या खोट्या बिलांचा घोटाळा, व्यापाऱ्याला अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2022 06:08 IST

आतापर्यंत राज्य जीएसटीकडून २५ जणांवर कारवाई.

मुंबई : ज्या व्यापाऱ्यांची नोंदणी रद्द झालेली आहे, अशा व्यापाऱ्यांकडून कागदोपत्री खरेदी दाखवत आणि त्या खरेदीच्या अनुषंगाने बनावट बिले सादर करत त्याद्वारे जीएसटी परतावा मिळविल्याप्रकरणी राज्य वस्तू व सेवा कर विभागाने निराकार रामचंद्र प्रधान या व्यापाऱ्याला अटक केली आहे. एप्रिलपासून राज्य जीएसटीने केलेली ही २५वी अटकेची कारवाई आहे. 

विभागातील उच्चपदस्थ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निराकार प्रधान याची मे. सनशाईन ट्रेडर्स नावाची कंपनी आहे. या कंपनीने ज्या कंपन्यांचा व्यवसाय नोंदणी दाखला रद्द झाला आहे, अशा व्यापाऱ्यांकडून प्रत्यक्षात खरेदी न करता ६९ कोटी ९९ लाख रुपयांची कागदोपत्री खरेदी दाखवली. तसेच, या व्यवहारात जीएसटीचा परतावा प्राप्त करण्यासाठी बनावट चलन सादर करत १२ कोटी ५९ लाख रुपयांचा परतावा प्राप्त केला. तर दुसरीकडे सुमारे ९१ कोटी २५ लाख रुपयांच्या मालाची प्रत्यक्षात विक्री न करता कागदोपत्रीच विक्री झाल्याचे दाखवले आणि याच्या बदल्यात बनावट जीएसटी चलन तयार करत याद्वारे १६ कोटी ४२ लाख रुपयांचा परतावा प्राप्त करून घेतला. राज्य जीएसटी विभागाच्या अधिकाऱ्यांना या संशयास्पद व्यवहारांची माहिती मिळाल्यानंतर कंपनीचे मालक निराकार प्रधान यांना विभागाने ताब्यात घेतले.प्रधान यांनी तब्बल १६१ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचे विभागाच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले आणि त्यांनी प्रधान याला अटक करुन अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्यासमाेर हजर केले असता त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. राज्य वस्तू व सेवा कर विभागाच्या अन्वेषण (अ) शाखेचे सहआयुक्त राहुल द्विवेदी यांच्या नेतृत्वाखाली पथकाने कारवाई केली आहे.

आजपर्यंत झाली २५ व्यापाऱ्यांना अटक

  • करचोरी शोधण्यासाठी जीएसटी विभागामधे आता मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञानाचा वापर सुरू आहे. जीएसटी नोंदणी केलेल्या व्यापाऱ्यांची सर्व माहिती संगणकीय स्वरुपात उपलब्ध आहे. 
  • या व्यापाऱ्यांचे वार्षिक व्यवहार यांची माहिती विभागाला या माध्यमातून मिळते. मात्र, एप्रिल २०२२ पासून आजवर ज्या २५ लोकांना विभागाने अटक केली आहे, त्यांच्यापैकी बहुतांश प्रकरणातील अटक आरोपींच्या कंपन्यांत अचानक मोठी उलाढाल दिसून आली. 

बनावट चलनाद्वारे शासनाच्या तिजोरीतून जे पैसे या कंपन्यांना मिळाले, ते पैसे या व्यापाऱ्यांनी बनावट कंपन्या स्थापन करून त्यात फिरवल्याचे दिसून आले. तसेच, तेथून हे पैसे काढून मग त्या बनावट कंपन्या अवघ्या दोन ते तीन महिन्यांत बरखास्त केल्या आहेत.  

टॅग्स :GSTजीएसटीfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारी