शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

पीएमसी बँकप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2019 20:44 IST

मठ्ठा यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल

ठळक मुद्दे बँकेला ४३५५.४६ कोटी रक्कमेचे नुकसान झाल्याचे आढळून आले आणि हा गैरप्रकार झाल्याचे उघड झाले.  आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल करत अधिक तपास सुरु केला आहे.

मुंबई - पीएमसी बँकप्रकरणीमुंबई पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरबीआयच्या प्रशासक यांच्या आदेशावरून जसबीर सिंग मठ्ठा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आर्थिक गुन्हे विभागाकडे (ईओडब्ल्यू) फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

मठ्ठा यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पीएमसी या बँकेचे व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस आणि अध्यक्ष वरियम सिंग आणि बँकेचे इतर पदाधिकारी तसेच एचडीआयएल कंपनीचा संचालक वाढवा यांनी २००८ ते २०९ या कालावधीत पीएमसी बँक, भांडुप (प.) या बँकेतील ठराविक कंपन्यांची मोठी कर्ज खाती ज्यामध्ये कर्ज परतफेड होत नसल्याने अनुत्पादक कर्ज (एनपीए) झाली असतानाही त्यांना अनुत्पादक कर्ज घोषित केले नाही आणि त्यांनी ही माहिती जाणीवपूर्वक आरबीआयपासून लपवून ठेवली आणि कमी कर्ज रक्कमेच्या बनावट कर्ज खात्यांचा बँकेचा खोटा व बनावट अभिलेख तयार करून आरबीआयला माहिती सादर केली. त्यामुळे बँकेला ४३५५.४६ कोटी रक्कमेचे नुकसान झाल्याचे आढळून आले आणि हा गैरप्रकार झाल्याचे उघड झाले. गैरव्यवहाराचे रक्कमेमध्ये आणि मोठ्या कर्जप्रकरणांपैकी प्रमुख कर्जदार आरोपी असलेली कंपनी हौसिंग डेव्हलपमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर लि. ग्रुप ऑफ कंपनीज असून त्यांनी बँकेच्या पदाधिकारी यांच्याशी संगनमत करून बेकायदेशीररित्या कर्ज प्राप्त करून घेतले आणि परतफेड देखील केली नाही. याबाबत आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल करत अधिक तपास सुरु केला आहे.

टॅग्स :PMC Bankपीएमसी बँकEconomic Offence Wingआर्थिक गुन्हे शाखाMumbaiमुंबईfraudधोकेबाजी