शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

बनावट सोन्याचे बिस्किटं देऊन फसवणूक करणाऱ्यास अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2019 21:51 IST

कमी किंमतीत सोन्याची बिस्कीटे विकण्याचे प्रलोभन दाखवून फसवणूक करीत असल्याचे उघड झाले आहे.

ठळक मुद्दे दीपक भीमराव शिंदे (33) असं अटक आरोपीचे असून याचा अधिक तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.तक्रारदार हे व्यवसायाने सोनार असून काही दिवसांपूर्वी ते सोने खरेदी करण्यासाठी झवेरी बाजार येथे गेले होते.

मुंबई - स्वस्त दरात सोने आणि बनावट सोन्याची बिस्किटं देण्याचे आमिष दाखवून सोने व्यापाऱ्याला गंडा घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला गुन्हे शाखेच्या पोलिसांनीअटक केली. दीपक भीमराव शिंदे (33) असं अटक आरोपीचे असून याचा अधिक तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.यातील तक्रारदार हे व्यवसायाने सोनार असून काही दिवसांपूर्वी ते सोने खरेदी करण्यासाठी झवेरी बाजार येथे गेले होते. त्यावेळी त्यांना यातील दोन आरोपींनी बाजार भावापेक्षा कमी दरात सोन्याची बिस्कीटे देण्याचे आमिष दाखविले. त्यानंतर त्या आरोपींनी तक्रारदाराल मोबाईलवर संपर्क साधून त्यांच्याकडे 30 हजार प्रति 10 ग्रॅम या दराने 2 हजार ग्रॅम सोने विक्री करत असल्याचे सांगून फिर्यादीस मीरा रोड येथे भेटण्यास बोलावले. त्याप्रमाणे तक्रारदार हे त्या दोन्ही आरोपींना भेटले असता त्यांनी फिर्यादीस सोन्याच्या 50 ग्रॅम वजनाचा बिस्कीटाचा नमुना दाखविला. तो नमुना तक्रारदाराने पडताळून पाहिला असता ते सोन्याचे असल्याची त्यांची खात्री झाली. त्यानंतर 5 नोव्हेंबर रोजी दुपारी पुन्हा आरोपींनी फिर्यादींना मोबाईलवर संपर्क करून सोने खरेदीबाबत विचारणा केली.त्यावेळी फिर्यादी यांनी त्यांचेकडे पूर्ण रक्कम उपलब्ध नसल्याचे सांगितले. त्यावेळी त्या दोन्ही आरोपींनी फियरादीस दोन किलोग्रॅम सोने हे ते प्रति 10 ग्रॅमचे 20 हजार या दराने देण्यास तयार असल्याचे सांगून हा व्यवहार तात्काळ करण्याची गळ घातली. त्यानुसार तक्रारदार यातील आरोपी हे अतिशया कमी दरात सोन्याची विक्री करण्यास तयार झाल्याने त्यांच्याकडे असलेले सोने हे चोरीचे असावे किंवा ते फसवणूक करणार असल्याचा संशया आला. दरम्यान, या फसवेगिरीची माहिती गुणेच शाखेच्या कक्ष -12 चे पोलीस उपनिरिक्षक हरिष पोळ यांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे वरिष्ठांच्या आदेशावरून कक्ष - 12 च्या पथकाने गावदेवी मंदिर, दहिसर पूर्व योथे सापळा लावला.त्यावेळी घाटला व्हिलेज. चेंबूर योथे राहणारा आरोपी दीपक शिंदे हा फियरादीस भेटण्यास आला. त्याने 10 सोन्याची बिस्कीटे फिर्यादीस दाखवली आणि त्यांना पैसे दाखविण्यास सांगितले. फिर्यादीने सोन्याचे बिस्कीटे पडताळून पाहिले असता ते सोने नसून सोनेरी रंगाचा मुलामा दिलेले अन्य धातूचे बिस्कीट असल्याचे त्यांचे लक्षात आले.त्यानंतर फिर्यादीने ठरल्याप्रमाणे पोलीस पथकास इशारा केल्यानंतर पोलिसांनी शिंदे याला घेराव घालून पकडले. 2 किलोग्रॅम वजनाची सोनेरी रंगाचा मुलामा दिलेले अन्य धातूची बिस्किटे जप्त करण्यात आली असून आरोपीला अटक करून पुढील कारवाईसाठी दहिसर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. आरोपी शिंदे याच्याकडे केलेल्या चौकशी असता तो आणि त्याची टोळी ही मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई परिसरातील सोने व्यापारी तसेच अन्य व्यापाऱ्यांना बाजारभावापेक्षा कमी किंमतीत सोन्याची बिस्कीटे विकण्याचे प्रलोभन दाखवून फसवणूक करीत असल्याचे उघड झाले आहे.

टॅग्स :ArrestअटकPoliceपोलिसMumbaiमुंबईGoldसोनं