शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

बनावट लग्न करून तरुणांची फसवणूक, विवाह लावून मागितली खंडणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2021 07:29 IST

प्राथमिक चौकशीत यातील महिलेने तब्बल आठ जणांशी विवाह करून खंडणी वसूल केल्याचे समोर आले आहे. यामागे मोठे रॅकेट असल्याचा अंदाज आहे.

आष्टी (जि. बीड) :  तरुणांसोबत बनावट विवाह करून चार-आठ  दिवस राहून पैसे उकळणाऱ्या टोळीचा आष्टी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. तालुक्यातील शिराळ येथील तरुणासोबत ९ मार्च रोजी विवाह करून दोन लाख रुपये न दिल्यास फसवून आणून बलात्कार केल्याचा खोटा गुन्हा दाखल करीन, अशी धमकी देत खंडणी वसूल करताना पोलिसांनी दोघांना पकडले, तर आणखी एका आरोपीला अहमदनगर जिल्ह्यातून ताब्यात घेतले आहे. प्राथमिक चौकशीत यातील महिलेने तब्बल आठ जणांशी विवाह करून खंडणी वसूल केल्याचे समोर आले आहे. यामागे मोठे रॅकेट असल्याचा अंदाज आहे.

सोनाली गणेश काळे (२९, रा. लातूर) व अजय महारुद्र चवळे (२७, रा. खंडापूर, जि. लातूर) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. त्यांना पाटोदा न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे, तर याप्रकरणी आणखी एक आरोपी रामा काशीनाथ बडे (रा. खर्डा, ता. जामखेड, जि. अहमदनगर) याला ताब्यात घेतल्याचे पोलिसांनी सांगितले.  

शिराळ येथील एका युवकाने आष्टी पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रार दिली होती. पोलीस निरीक्षक सलीम चाऊस यांनी या तक्रारीची खात्री करण्यासाठी दोन शासकीय पंचांसह सापळा रचला. एक महिला व पुरुषाने मागणी केल्याप्रमाणे तक्रारदार युवकाकडून रोख रक्कम ५० हजार रुपये शासकीय पंचांसमक्ष स्वीकारत असताना पकडण्यात आले.  

आमिषाला बळी पडू नये वय जास्त झालेल्या तरुणांना संपर्क करून लग्नाचे आमिष दाखवून या टोळीकडून आमच्याकडे मुलगी आहे, असे सांगून स्थळ दाखवले जाते व लग्नासाठी पैशांची मागणी करून वारंवार खंडणी वसूल केली जाते. अशा टोळ्यांपासून तरुणांनी सावध राहावे, अशी फसवणूक झाली असल्यास पोलिसांशी संपर्क करावा.         - सलीम चाऊस, पोलीस निरीक्षक, आष्टी

टॅग्स :fraudधोकेबाजीmarriageलग्नBeedबीड