शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

एटीएम सेंटरमध्ये ग्राहकांना मदत करण्याच्या बहाण्याने गंडा; चौकडीस अटक

By जितेंद्र कालेकर | Updated: January 12, 2023 23:17 IST

...त्यांच्याकडून आठ गुन्हे उघडकीस आले असून, १०१ एटीएम कार्ड जप्त केल्याची माहिती पोलिस उपायुक्त शिवराज पाटील यांनी गुरुवारी दिली.

ठाणे : एटीएम सेंटरमध्ये ग्राहकांना मदत करण्याच्या बहाण्याने वृद्धांसह अनेकांना गंडा घालणाऱ्या सनी मुन्नासिंग उर्फ सनी चिकणा (२८, रा. कोळशेवाडी, कल्याण) याच्यासह चार जणांच्या टोळक्याला ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने अटक केली. त्यांच्याकडून आठ गुन्हे उघडकीस आले असून, १०१ एटीएम कार्ड जप्त केल्याची माहिती पोलिस उपायुक्त शिवराज पाटील यांनी गुरुवारी दिली.

भिवंडी येथे राहणाऱ्या तसेच ठाण्यातील एका खासगी कंपनीत नोकरी करणाऱ्या रुपाली बोचरे (३२) यांना त्यांच्या एका नातेवाइकास पैसे पाठवायचे असल्याने त्या वागळे इस्टेट भागातील रोड क्रमांक २२ येथील एसबीआय बँकेच्या एटीएममध्ये पैसे डिपॉझिट करण्यासाठी २ जानेवारी २०२३ रोजी गेल्या होत्या. एटीएमद्वारे ५० हजारांची रोकड डिपॉझिट करीत असताना तिथे एका अज्ञाताने त्यांना मदत करण्याचा बहाणा केला. त्याने पैसे कसे डिपॉझिट करावे, असे सांगत असतानाच एटीएम कार्ड बदलून दुसरेच कार्ड रुपाली यांना दिले. यावेळी त्याने रुपाली यांच्या एटीएमचा पिन क्रमांकही चलाखीने माहिती करून घेतला. त्यानंतर काही वेळातच त्यांच्या बँक खात्यातून ३८ हजार ५०० रुपये त्याने काढून घेतले. याप्रकरणी रुपाली यांनी श्रीनगर पोलिस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर हा तपास ठाणे खंडणीविरोधी पथकाकडे सोपविण्यात आला.घटनास्थळी असलेले सीसीटीव्ही फुटेज, संशयिताचे वर्णन आणि गुप्त खबरीद्वारा मिळालेल्या माहितीच्या आधारे यातील एक भामटा पंढरपूर येथे पळून गेल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक मालोजी शिंदे यांना मिळाली. त्यानंतर पोलिस उपनिरीक्षक महेश कवळे, हवालदार तानाजी पाटील आणि अरविंद शेजवळ आदींच्या पथकाने एसबीआय बँकेच्या सीसीटीव्ही फूटेजची पडताळणी केली. त्यानंतर सनी उर्फ सनी चिकणा, श्रीकांत गोडबोले  उर्फ श्री (२८, उल्हासनगर), हरिदास मोहन मगरे उर्फ हऱ्या  (२५, उल्हासनगर) या तिघांना ९ जानेवारी रोजी पंढरपूर येथून, तर रामराव उर्फ कचरू शेंडफड शिरसाठ (३५, रा. उल्हासनगर) याला उल्हासनगर येथून अटक झाली. त्यांच्याविरूद्ध पूर्वी असे नऊ गुन्हे दाखल असून, आणखी आठ गुन्ह्यांची त्यांनी कबुली दिली. त्यांच्याकडून फसवणूकीतील रकमेपैैकी ७० हजारांची रोकड, गुन्हयासाठी वापरलेले वाहन आणि इतर सामुग्री असा चार लाख सहा हजार दोनशे रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.त्यांना १३ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. या टोळीने ठाणे व नवी मुंबई परिसरात अशाच प्रकारे अनेकांची फसवणूक केल्याचे तपासात उघड झाल्याचे उपायुक्त पाटील यांनी सांगितले. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीatmएटीएमPoliceपोलिस