शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

पैसे गुंतवणुकीवर भरगच्च व्याजाचे आमिष दाखवून आठ कोटींची फसवणूक; दोघांना अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2021 10:13 IST

  या कंपनीने वसई विरार परिसरातील नागरिकांना त्यांच्या गुंतवणुकीवर २५ ते ५० टक्के, असे भरगोस व्याज देण्याचे आमिष दाखविण्यात आले होते.

वसईतील शेकडो लोकांचे पैसे इतरत्र गुंतवणूक करून आठ कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या दोन आरोपींना  माणिकपूर पोलिसांनी अटक केली आहे. अमित कांतीलाल जैन आणि योगेश भालेराव, अशी या दोन आरोपींची नावे आहेत. यांनी वसईत मे. एज इडू प्लस कन्सल्टन्सी प्रा. लि. (Aaj Edu Plus Consultancy Pvt Ltd. ) नावाने कंपनी सुरू केली होती. या कंपनीने वसई विरार परिसरातील नागरिकांना त्यांच्या गुंतवणुकीवर २५ ते ५० टक्के, असे भरगोस व्याज देण्याचे आमिष दाखविण्यात आले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,आरोपींनी वसई परिसरातील तब्बल २१५  गुंतवणूकदारांकडून तब्बल ८ कोटी ७१ लाखांची रक्कम उकळली आणि त्यानंतर  गुंतवणूकदारांची फसवणूक करून आरोपी दुबई येथे पळून गेले होते. पोलीस या गुन्ह्याचा तपास करीत असतानाच आरोपी अमित जैन हा वसईच्या चिंचोटी परिसरात आला होता तर दुसरा आरोपी योगेश भालेराव हा गुजरात येथे आल्याचे  समजताच दोन्ही आरोपींना  पोलिसांनी सापळा रचून अटक केली. या आरोपींनी ग्राहकांकडून पैसे लुबाडून चिंचोटी येथे रो-हाऊस, तथा बंगलो व पुणे येथील रेल्वे स्टेशन जवळ जमिन खरेदी केली होती. पोलिसांनी या सर्व जागादेखील जप्त केल्या आहेत. अधिक तपास केला जात असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त पदमजा बडे यांनी दिली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीVasai Virarवसई विरारPoliceपोलिस