शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

बँक खाते बंद होणार असल्याची बतावणी करून फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2019 01:55 IST

तुमची जन्मतारीख चुकीची असल्यामुळे स्टेट बँक आॅफ इंडियामधील बँक खाते बंद करण्यात येणार असल्याची बतावणी करून एका भामट्याने ठाण्यातील नितीन वीरकर (५८) यांचे चार लाख ३५ हजार ९८० रुपये आॅनलाइन लुबाडले.

ठाणे : तुमची जन्मतारीख चुकीची असल्यामुळे स्टेट बँक आॅफ इंडियामधील बँक खाते बंद करण्यात येणार असल्याची बतावणी करून एका भामट्याने ठाण्यातील नितीन वीरकर (५८) यांचे चार लाख ३५ हजार ९८० रुपये आॅनलाइन लुबाडले. हा प्रकार बुधवारी सकाळी पाचपाखाडी येथे घडला. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.पाचपाखाडीमध्ये राहणाऱ्या वीरकर यांच्या मोबाइल क्रमांकावर २७ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास एका भामट्याने एक एसएमएस पाठवून त्यामध्ये एक लिंक पाठविली. मजकुरामध्ये ‘तुमची जन्मतारीख चुकीची असल्यामुळे तुमचे एसबीआयचे खाते आजपासून बंद करण्यात येत आहे’, असा उल्लेख करण्यात आला.या एसएमएसमधील मोबाइल क्रमांकावर वीरकर यांनी संपर्क साधला. तेव्हा समोरील व्यक्तीने संतोष श्रीवास्तव असे नाव सांगितले. त्यानंतर त्याने एसबीआय आणि ग्रेटर बँकेच्या बचत खात्याची संपूर्ण माहिती आॅनलाइन आयडी आणि पासवर्डही मागितले.ही संपूर्ण माहिती वीरकर यांनी दिल्यानंतर त्यांच्या दोन्ही बँक खात्यातून चार लाख ३५ हजार ९८० रुपये आयडीएफसी बँकेत वळते करण्यात आले. याबाबत प्रत्यक्ष बँकेत चौकशी केल्यानंतर श्रीवास्तव नाव सांगणाºयाने त्यांची फसवणूक केल्याचे समोर आले.याप्रकरणी वीरकर यांनी अखेर २७ नोव्हेंबर रोजी नौपाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीसह माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत आवारे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीthaneठाणे