शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

नवविवाहितेकडून गरिबीचे नाटक करून फसवणूक, भिवंडीतील तीन महिलांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2021 05:07 IST

Fraud : रीना देवरे (२३) असे गरिबीच्या नावाने लग्न करून तरुणांना लुटणाऱ्या तरुणीचे नाव आहे.

भिवंडी : फसवणुकीच्या अनेक घटना आपल्या आजूबाजूला नेहमीच घडतात. मात्र, वेगवेगळ्या तरुणांशी गरिबीच्या नावाने लग्न करून त्यांच्याकडून पैसे व दागिने घेऊन नवविवाहित वराची फसवणूक झाल्याचा प्रकार भिवंडीत समोर आला आहे. गरिबीच्या नावाने लग्न करून तरुणांना लुटल्याप्रकरणी शांतीनगर पोलिसांनी भामट्या तरुणीसह तिच्या आईला व त्यांची आणखी एक महिला साथीदार अशा तिघींना शांतीनगर पोलिसांनी अटक केली आहे. रीना देवरे (२३) असे गरिबीच्या नावाने लग्न करून तरुणांना लुटणाऱ्या तरुणीचे नाव आहे.तरुणीची आई मंगला देवरे व मावशी सुनीता माहिरे यांच्या मदतीने रीना हिचे आईवडील नाही. ती खूप गरीब आहे, अशी खोटी माहिती सांगून रीनाचे लग्न लावत असत. मात्र, लग्न झाल्यानंतर रीना आपल्या पतीला वेगवेगळी खोटी कारणे सांगून पळून जायची. जाताना लग्नात नवरदेवाने दिलेले पैसे व दागिने घेऊन जायची. वेगवेगळ्या ठिकाणचा खोटा पत्ता त्या प्रत्येकवेळी देत असल्याने सापडत नव्हत्या. ३० मार्च रोजी भादवड येथील हरेश पाटील याच्याशी तिचा चौथा विवाह झाला. ३० मार्च रोजी ती भादवड येथील हरेश याच्या घरी आली, तिथे विवाहही झाला. सुरुवातीला तिने हरेशकडून पाच हजार रुपये घेतले. त्यानंतर लग्नाच्या खरेदीसाठी ४० हजार घेतले व त्यानंतर २९ मार्च रोजी हळदीच्या दिवशी आईला कोरोना झाला, असे सांगून ५० हजार रुपये खात्यात जमा करून घेतले.रीना व तिच्या आईने तिचा पाचवा विवाह धुळे येथील एका तरुणासोबत जमविला होता. या तरुणाकडून रीनाने ६० हजार रुपये घेतले होते. त्याच्याशी विवाह करायचा असल्याने रीना हिने माहेरी जाण्याचा हट्ट धरला होता. त्यासाठी पतीला आईची तब्येत बरी नसल्याचे कारण सांगितले. मात्र, पतीने मीही सोबत येतो, असे सांगितल्यानंतर रीना हिने त्यास नकार दिला व विनाकारण भांडण करण्यास सुरुवात केली. अखेर, पत्नीच्या वागण्याचा हरेश याला संशय आल्याने त्याने मंगळवारी थेट शांतीनगर पोलीस ठाणे गाठले व तक्रार दाखल केली. पोलिसांनी रीना, मंगला व सुनीता यांना ताब्यात घेतले असता फसवणुकीचा प्रकार समोर आला. त्यांना न्यायालयात हजर केले असता १६ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

टॅग्स :marriageलग्नCourtन्यायालय