शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
4
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
5
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
6
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
7
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
8
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
9
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
10
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
11
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
12
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
13
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
14
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
15
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
16
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
17
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
18
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
19
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
20
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले

मुंबईच्या डबेवाल्यांना गंडा; सुभाष तळेकरला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2021 02:21 IST

Crime News: मोफत दुचाकी देण्याच्या नावाखाली फसवणूक 

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : देशभरात ख्याती असलेल्या मुंबईच्या डबेवाल्यांना मोफत दुचाकी देण्याच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या डबेवाला असोसिएशनचा माजी अध्यक्ष सुभाष तळेकरला अखेर मंगळवारी घाटकोपर पोलिसांनी पुण्यातून अटक केली. 

डबेवाल्यांच्या अशिक्षितपणाचा फायदा घेत त्यांना मोफत दुचाकी देण्याचे आश्वासन देत तळेकरने २०१५मध्ये  वेगवेगळ्या कागपत्रांवर सह्या घेतल्या. अशात, तळेकर आणि त्याच्या साथीदारांनी या सह्यांच्या वापर करून भैरवनाथ पतसंस्थेकडून डबेवाल्यांच्या नावाने वाहन कर्ज घेऊन एकरकमी धनादेश डिलरकडे सुपूर्द केला. पण प्रत्यक्षात त्याने फक्त १५ डबेवाल्यांना  मोपेड गाड्या दिल्या, तर २३ डबेवाल्यांना गाड्यांची नोंदणी न करता गाड्या दिल्या व उर्वरितांना गाड्याच दिल्या नाहीत. परंतु त्यांच्या नावे कर्ज लाटले. वाहन न मिळाल्याने सुरुवातीला डबेवाल्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. अशात २०१९मध्ये कर्जाची परतफेड न केल्यामुळे मालमत्ता जप्तीच्या नोटीस डबेवाल्यांना बजावण्यात आल्या. यात फसवणूक झाल्याने त्यांनी पोलिसांत धाव घेतली. 

सहानुभूतीचा केला वापरn सुभाष तळेकरने वेगवेळ्या क्षेत्रात डबेवाल्यांच्या सहानुभूतीचा वापर करून लाखोंचा निधी बळकावला. n डबेवाल्यांच्या नावाने फक्त कौटुंबिक व्यक्तींना सोबत घेऊन बोगस संस्था स्थापन केली. n कोरोना काळात डबेवाल्यांना करण्यात येणाऱ्या वस्तुरूपी आणि आर्थिक मदतीचा घोटाळा केल्याचाही आरोप त्याच्यावर आहे. त्याच्यावर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी डबेवाला संघटनेकडून होत आहे.

टॅग्स :fraudधोकेबाजी