शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

घटस्फोटीत महिलेची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2019 01:40 IST

एका वधू-वर सूचक मंडळाकडून नाव दिलेल्या इच्छुक वराने भार्इंदरच्या घटस्फोटीत महिलेस लग्नाचे आमिष दाखवून एक लाख रुपयांना गंडवल्याबाबत नवघर पोलिसात दोघा भामट्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

मीरा रोड : एका वधू-वर सूचक मंडळाकडून नाव दिलेल्या इच्छुक वराने भार्इंदरच्या घटस्फोटीत महिलेस लग्नाचे आमिष दाखवून एक लाख रुपयांना गंडवल्याबाबत नवघर पोलिसात दोघा भामट्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.फसवणूक झालेली घटस्फोटीत महिला ही भार्इंदर पूर्वेला आई, वडील व मुलीसह राहते. तिच्या वडिलांनी लग्नासाठी मुलीचे नाव नोंदवले होते. संस्थेकडून मनिष अग्रवाल या घटस्फोटीत इच्छुक वराचे नाव, फोटो, पत्ता देण्यात आले. अग्रवाल याने आपला दिल्ली व वांद्रे बँडस्टँड येथील पत्ता, दोन भ्रमणध्वनी क्रमांक दिले होते. त्याला नऊ वर्षांची मुलगी असल्याचे नमूद होते. २८ मार्चला महिलेने अग्रवाल याच्या व्हॉट्सअ‍ॅपवर स्वत:ची माहिती, फोटो पाठवले असता त्याने लग्नास होकार दिला. अग्रवालने दुसऱ्या क्रमांकावरुन मेसेज करुन आपण दिल्लीला ‘बेटियाँ और आश्रय’ नावाची सामाजिक संस्था चालवत असून त्यास पैसे पाठवण्याचे आवाहन केले. महिलेने अग्रवालच्या खात्यावर एक लाख ८ हजार रुपये जमा केले. त्यानंतर तिने सतत अग्रवाल याला भेटण्याचा प्रयत्न केला असता तो टाळाटाळ करत होता. त्यामुळे ती त्याच्या वांद्रे येथील पत्त्यावर गेली. तेथे चौकशी केली असता रखवालदाराने मनिष अग्रवाल नावाचे कोणीच रहात नसल्याचे सांगितले. आपले पैसे परत करण्यासाठी त्याला संदेश पाठवूनही त्याने प्रतिसाद दिला नाही. त्यांनी पैसे भरलेल्या संस्थेची माहिती आपल्या बँकेत जाऊन घेतली असता ते खाते राजस्थानच्या सिक्करमधील लक्ष्मणगडच्या रोरु येथील असल्याचे समजले. सदर खाते हे संस्थेचे नसून जितेंद्रसिंग जिरावरसिंग याच्या नावे होते. त्याचा भ्रमणध्वनी मिळवून त्यावर फोन केला असता अग्रवाल हा आपला मित्र असून आपल्या खात्यात पैसे आले आहेत. व ते आपले असल्याचे सांगून त्याने फोन कट केला. याप्रकरणी त्यांनी पोलिसात मनिष व जिरावरसिंग विरोधात गुन्हा दाखल केला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी