शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

तळवलकर्ससह इनशेपच्या संचालकावर फसवणुकीचा गुन्हा; बँकेची ३४ कोटी ८८ लाखांची फसवणूक केल्याचा आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2021 06:53 IST

हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला असून तळवलकर्स विरोधातील हा तिसरा गुन्हा आहे.

मुंबई : व्यायामशाळा क्षेत्रातील प्रसिद्ध तळवलकर्स बेटर व्हॅल्यू फिटनेस लिमिटेड आणि इनशेप हेल्थ अँड फिटनेस कंपनीच्या ५ संचालकांविरुद्ध मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात बँकेची ३४ कोटी ८८ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. तळवलकर्स विरोधातील हा तिसरा गुन्हा आहे.

नरिमन पॉइंट येथील साऊथ इंडीयन बँकेत कार्यरत असलेले ऋषिकेश यशवंत सावंत यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल झाला आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, इनशेप हेल्थ अँड फिटनेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संचालक दिनेश श्रीनिवास राव, राजेंद्रन, जवाहर दीपा, अदित्य सिंग धिल्लन तसेच तळवलकर्स बेटर व्हॅल्यू फिटनेस लिमिटेडचे संचालक हर्ष भटकळ व इतर साथीदारांनी बँकेची फसवणूक केली. बंगळुरू येथे नवीन जीम सुरू करण्यासाठी बँकेकडून २०१८ मध्ये ३८.७६ कोटी कर्ज घेतले. मात्र, ज्यासाठी कर्ज घेतले त्याचा वापर केला नाही. सुरुवातीचे काही हप्ते भरल्यानंतर २०१९ पासून हप्ते भरणे बंद केले. तसेच दिलेल्या कर्जापैकी अवघे ३ कोटी ४३ लाख रुपयांची परतफेड केल्याचा आरोप त्यांनी केला. 

बँकेच्या चौकशीत, कर्जाची पूर्ण रक्कम इंटेरियर व जीमच्या साहित्यासाठी खर्च करणे अपेक्षित असतानाही जीममध्ये साहित्य आढळले नाही. शिवाय २० जीमपैकी १२ जीम कार्यरत नसल्याचेही आढळले. इनशेपच्या मालकीचा न्यूफॉर्म स्टुडिओने अंध्रा बँकेकडून कर्ज घेतले आहे. त्यांनासुद्धा यापैकी १३ जीम तारण असल्याचे आढळले. यासाठी बँकेची एनओसीही घेतली नाही. तसेच सप्टेंबर २०१९ पासून कंपनीने दैनंदिन कलेक्शन बंद करत, येणारे कलेक्शन हे पीडब्लूजी फिटनेस प्रा. लि. बंगळुरूकडे वळते केल्याचेही दिसून आल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.

ॲक्सिस बँकेचे २०६ कोटींचे बुडीत कर्ज २०१६ ते २०१९ या कालावधीत ॲक्सिस बँकेची २०६ कोटी ३५ लाखांच्या फसवणुकीच्या आरोपावरून तळवलकर्स बेटर व्हॅल्यू फिटनेस लि.चे गिरीश मधुकर तळवलकर, प्रशांत सुधाकर तळवलकर, विनायक गवांदे, अनंत गवांदे, हर्ष भटकर, मधुकर विष्णू तळवलकर, दिनेश राव व गिरीश नायक यांच्याविरोधात १४ ऑक्टोबरला गुन्हा दाखल झाला आहे. आर्थिक गुन्हे शाखेने याप्रकरणी सहा महिने प्राथमिक चौकशी ही  कारवाई केली. त्यापाठोपाठ अन्य बँकांनीही तक्रारीसाठी पोलिसांत धाव घेतली. पश्चिम उपनगरातही एक गुन्हा नोंदवत तो आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीbankबँकMONEYपैसा