शहरं
Join us  
Trending Stories
1
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
2
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
3
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
4
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
5
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
6
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
7
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
8
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
9
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
10
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
11
...जेव्हा मगरीने भरलेल्या तुडुंब नदीत आईनेच मुलाला फेकून दिले
12
सरकारच्या अनुदानामुळे १५ लाख ईव्हींची विक्री; फेम-२ योजनेतील ९० टक्के निधीचा पाच वर्षांत विनियोग
13
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
14
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

नागपुरात  उद्योजकाला ४८ लाखांचा गंडा : एमआयडीसीत गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2020 10:20 PM

दोन वर्षांत छोटे-मोठे व्यवहार करून विश्वास संपादन केल्यानंतर गोंडखैरीच्या दोन व्यापाऱ्यांनी एमआयडीसीतील एका उद्योजकांकडून ४८ लाखांचा माल उचलला. ही रक्कम न देता आरोपी परप्रांतात पळून गेले.

ठळक मुद्देसलगी वाढवून केला विश्वासघात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दोन वर्षांत छोटे-मोठे व्यवहार करून विश्वास संपादन केल्यानंतर गोंडखैरीच्या दोन व्यापाऱ्यांनी एमआयडीसीतील एका उद्योजकांकडून ४८ लाखांचा माल उचलला. ही रक्कम न देता आरोपी परप्रांतात पळून गेले. विमलकुमार जैन आणि जितेंद्रकुमार जैन अशी आरोपींची नावे आहेत. हे दोघे गोंडखैरी (कळमेश्वर) येथील एचव्हीआर प्रोजेक्ट प्रा. लि. चे संचालक आहेत.फिर्यादी कमलेश जगदीशराय गोयल (रा. वाडी) यांची एमआयडीसीतगणेश अ‍ॅण्ड कंपनी नावाने फर्म आहे. दोन वर्षांपूर्वी आरोपी जितेंद्रकुमार आणि विमलकुमार यांच्यासोबत गोयल यांची ओळख झाली. त्यानंतर जैन यांनी गोयल यांना व्हॉटस्अ‍ॅपवर मेसेज, कॉल करून सलगी साधली. त्यांच्याकडून माल विकत घेऊन छोटे मोठे व्यवहार करीत आरोपींनी विश्वास संपादन केला. त्यानंतर २७ सप्टेंबर २०१८ ते १९ मार्च २०१९ या कालावधीत आरोपींनी गोयल यांच्याकडून ४७ लाख ८६ हजार ७६० रुपयांची एमएस प्लेट, राऊंड, विविध उपकरणे तसेच यंत्र विकत घेतले. ठराविक मुदतीत ही रक्कम देण्याचे ठरले असताना आरोपींनी गोयल यांना त्यांच्या मालाची रक्कम न देता पळ काढला. बरेच दिवस पाठपुरावा करूनही आरोपी दाद देत नव्हते. ते कोलकाता येथे पळून गेल्याचे गोयल यांना कळाले. जैन यांनी विश्वासघात केल्याचे लक्षात आल्याने गोयल यांनी एमआयडीसी ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी सोमवारी या प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध घेतला जात आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी