शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

फ्रान्सिस्को काव्र्हालो खून प्रकरण : दोन फरार संशयित अखेर जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2019 20:08 IST

हत्येच्या घटनेनंतर आठवडयानंतर हे दोघे संशयित पोलिसांना सापडले.

ठळक मुद्देदारुच्या नशेत झालेल्या भांडणातून हा खून झाला होता.अटक केलेले दोन्हीही संशयित या हत्या प्रकरणातील प्रमुख संशयित आहेत.

मडगाव - गोव्यातील राय - मनोरा येथे फ्रानिस्को कुलासो (33) याचा खून करुन मुंबईत पळून गेलेला दोन संशयितांच्या आज गोवा पोलिसांनी मडगावात मुसक्या आवळल्या. जॉयल ग्रासा (24) व वोर्फिन कुलासो (22) यांना आज गुरुवारी सकाळी जेरबंद करण्यात आले. हत्येच्या घटनेनंतर आठवडयानंतर हे दोघे संशयित पोलिसांना सापडले. खून केल्यानंतर ते दोघेही मुंबईला पळून गेले होते. पोलिसांनी एक पथक मुंबईलाही पाठविले होते. संशयितांविरुध्द पोलिसांनी न्यायालयातून अजामीनपात्र अटक वॉरन्टही मिळविले होते. आज सकाळी मुंबईहून वरील संशयित गोव्यात आले असता, त्यांना मडगावात पोलिसांनी ताब्यात घेतले. नंतर त्यांना रितसर अटक करण्यात आल्याची माहिती मडगाव विभागाचे पोलीस उपअधिक्षक राजू राउत देसाई यांनी दिली. अटक केलेले दोन्हीही संशयित या हत्या प्रकरणातील प्रमुख संशयित आहेत.मागच्या गुरुवारी रात्री फ्रान्सिस्को याचा खून झाला होता. दारुच्या नशेत झालेल्या भांडणातून हा खून झाला होता. मयत फ्रान्सिस्को आरडाओरडा करत असल्यामुळे संतापलेल्या सहा युवकांनी त्याच्यावर फुटलेल्या बाटलीने हल्ला चढविला. मृतदेहाची ओळख पटल्यानंतर मायणा - कुडतरी पोलिसांनी या खून प्रकरणाचा छडा लावताना रॉयन आल्वारिस (21), विल्टन कुतिन्हो (34), मेल्बर्न कुतिन्हो (22) रहाणारे सर्व नुवे व वालेन्सियो वाझ (26) शिरोडा या चौघांना अटक केली होती. मारामारीचा हा प्रकार राय - मनोरा येथे कार्लटन बारजवळ घडला होता. या बारमध्ये सर्व सहा संशयित दारु पित बसलेले असताना त्यापूर्वी आणखी दोन बारमध्ये जाऊन दारु पिऊन तर्र होऊन आलेला फ्रान्सिस्को या बारमध्ये येऊन दारुसाठी मोठमोठय़ाने दंगा करु लागला. त्यामुळे संशयित खवळले. त्यांची मयताकडे बाचाबाची झाली त्यानंतर रागाच्या भरात संशयितांनी त्याच्यावर फुटलेल्या बाटलीने वार केले होते. या मारहाणीने मयत बेशुद्ध होऊन पडला असता संशयितांनी त्याला आपल्या मोटरसायकलवर बसवून वाशे-लोटली येथे पुलाजवळ नेऊन टाकून दिले होता.६ सप्टेंबर रोजी पोलिसांना बोरी पुलाच्या खाली मृतदेह असल्याचे कळविल्यानंतर पोलिसांनी तेथे जाऊन पहाणी केली असता मृताच्या अंगावर चार जखमा सापडल्याने पोलिसांनी अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्हा नोंद केला होता. कुठलाच सुगावा मिळत नसल्याने हा खून पोलिसांसाठी आव्हान बनले होते. या खूनाचा तपास करण्यासाठी उपअधीक्षक राजीव राऊत देसाई यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक प्रविणकुमार वस्त, संदेश चोडणकर, रवी देसाई, विल्सन डिसोझा, तुषार लोटलीकर, राहुल परब, सलीम शेख, पोलीस शिपाई अविनाश नाईक, सोमनाथ नाईक, अजय नाईक, विकास नाईक, विकास कौशिक व चेतन कोळी यांचे पथक तैनात केले होते. या पथकाने राय-मनोरा भागातील सर्व दारुची दुकाने पिंजून काढून माहिती गोळा केली होती. त्यात काल्र्टन बारमध्ये दंगा झाल्याचे त्यांना कळून चुकल्यानंतर त्यांनी संशयितांच्या मुसक्या आवळल्या.जॉयल ग्रासा व वोर्फिन कुलासो हे फरार झाले होते. जॉयल हा वीज खात्यात कंत्रटी कामगार म्हणून करत होता तर वोर्फिन हा परदेशात कामाला होता अशी माहिती पोलिसांनी दिली. भारतीय दंड संहितेच्या 302 व 363 कलमाखाली त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दरम्यान, या खून प्रकरणात पुर्वी अटक केलेल्या चार संशयितांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने काल त्यांना न्यायालयात उभे केले असता, आठ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. मायणा - कुडतरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार वस्त यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील पोलीस तपास चालू आहे. 

टॅग्स :ArrestअटकPoliceपोलिसgoaगोवाMurderखूनCrime Newsगुन्हेगारी