शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

बॉलिवूडचे कनेक्शन असलेले चौथे सेक्स रॅकेट उध्वस्त; पुण्याच्या महाविद्यालयातील मुलींची सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2020 14:55 IST

या सेक्स रॅकेटचे देखील बॉलिवूड कनेक्शन असल्याचे स्पष्ट झाले आहे.

ठळक मुद्देयाप्रकरणी नावेद शरीफ अहमद अखतर (२६) या प्रोडक्शन मॅनेजर आणि नावीद सादीक सय्यद (२२) या कास्टिंग डायरेक्टरला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दोन मुली स्टुडंड व्हिसावर पुण्याच्या महाविद्यालयात शिक्षण घेत असल्याची माहिती पोलीस तपासात उघडकीस आली आहे. महिला साथीदार दलालाचा शोध पोलिस घेत आहेत. 

मुंबई - २० जानेवारी रोजी अनैतिक मानची वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या समाजसेवा शाखेच्या पथकास विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अंधेरी पूर्व येथील इम्पिरियल पॅलेस हॉटेल थ्री स्टार हॉटेलमध्ये छापा टाकून ३ मुलींची सुटका करण्यात आली आहे. त्यापैकी दोन मुली स्टुडंड व्हिसावर पुण्याच्या महाविद्यालयात शिक्षण घेत असल्याची माहिती पोलीस तपासात उघडकीस आली आहे. तर या सेक्स रॅकेटचे देखील बॉलिवूड कनेक्शन असल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी नावेद शरीफ अहमद अखतर (२६) या प्रोडक्शन मॅनेजर आणि नावीद सादीक सय्यद (२२) या कास्टिंग डायरेक्टरला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.नावेद शरीफ अहमद अखतर (२६) या प्रोडक्शन मॅनेजर आणि नावीद सादीक सय्यद (२२) या कास्टिंग डायरेक्टर दोघेही बॉलिवूडशी संबंधित असून ते वेश्याव्यवसायाकरिता मॉडेल आणि परदेशी मुली पुरवित असल्याची तसेच एका मुलीकरीता प्रत्येकी ४० हजार रुपये पैसे घेत असल्याची खात्रीलायक माहिती समाजसेवा शाखेला प्राप्त झाली होती. या माहितीच्या अनुषंगाने काल समाजसेवा शाखेच्या पथकाने बोगस गिऱ्हाईक पाठवून वेश्या व्यवसाय चालविणारा दलाल नावेद याच्याशी संपर्क साधून अंधेरी पूर्व येथील इम्पिरियल पॅलेस हॉटेल या थ्री स्टार हॉटेलमध्ये छापा टाकून केलेल्या कारवाईत ३ पीडित मुलींची सुटका करण्यात आली. त्यापैकी दोन मुली या तुर्कमेनिस्तान या देशाच्या नागरिक असल्याये निष्पन्न झाले असून त्या दोषी स्टुडंट व्हिसावर शिक्षणाकरीता भारतात आल्या असून सध्या त्या पुणे येथील महाविद्यालयात कला शाखेत शिक्षण घेत आहेत. यापूर्वी नमुद परदेशी मुली मुंबईत शुटींगकरीता आल्या असताना त्याची ओळख आरोपीसोबत झाली होती. त्या ओळखीचा फायदा घेवुन बॉलीवुडमध्ये काम पाहिजे असल्यास त्याआधी तडजोड करावी लागेल तसेच एका बँडच्या जाहिरातीचे शुट असून त्याकरिता परदेशी मुलांची आवश्यकता असल्याचे सांगून त्याकारीता शरीरसंबंध ठेवावे लागतील असे दलालांनी पीडित मुलींना सांगितले.  हॉटेलमधील धाडीत सापडलेल्या भारतीय मुलीकडे चौीकशी केली असता तिने नमुद गुन्हयातील पाहिजे आरोपी दलाल महिलेने नमूद गुन्हयातील अटक आरोपी नावेद याच्या ओळखीने  तिला वेश्या व्यवसायासाठी या हॉटेलमध्ये पाठविल्याचे सांगितले. तसेच ही दलाल महिला तिच्या वर्सोवा येथील घरात दोन मुलींना वेश्या व्यवसायासाठी ठेवून त्या देखील पुरवत असल्याची अधिक माहिती पोलिसांना भारतीय मुलीने दिली.अंधेरी पोलीस ठाणे येथे भा.दं. वि. तसेच अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदयाच्या कलमान्यये गुन्हा नोंद करण्यात आला असून नमुद गुन्हयात बॉलीवूडमध्ये काम देण्याचे आमीष दाखवून सेक्स रॅकेट चालविणारे दलाल नावेद शरीफ अहमद अख्तर (२६) आणि नाबीद सादीक सय्यद (२२) या दोघांना ताब्यात घेण्यात आले असून महिला साथीदार दलालाचा शोध पोलिस घेत आहेत. 

 

पोलिसांनी उघड केलेली मागील तीन सेक्स रॅकेटचा प्रकरणे३ जानेवारी २०२० रोजी जुहू परिसरातील झेड लक्झरी रेसीडेन्सी या तारांकित हॉटेलमध्ये छापा टाकून उझबेकीस्तान देशाच्या २ पीडित मुलीची सुटका करण्यात आली होती. बॉलीवूडमधील कास्टिंग डायरेक्ट राजेश कुमार कामेश्वर लाल याला या गुन्हयात अटक करण्यात आली.

१४ जानेवारी २०२० रोजी कॅफे कॉफी हे जे.पी.रोड, ७ बंगला, वर्सोवा, अंधेरी याठिकाणी सापळा रचून २ पीडित मुलीची सुटका करण्यात आली होती. या मुलींनी हिंदी चित्रपटामध्ये ज्युनिअर आर्टिस्ट म्हणून तर बॉलीवुडमध्ये मेकअप आर्टिस्ट म्हणून म्हणून काम केले आहे. या प्रकरणी बॉलीवुडमध्ये कास्टींग डायरेक्टर म्हणून काम करणारा दलाल नविनकुमार प्रेमलाल आर्या (३२) यास अटक करण्यात आली.१६ जानेवारी २०२० रोजी अंधेरी येथील इंगनफ्लाय हॉटेल या थ्री स्टार हॉटेलमध्ये छापा टाकून केलेल्या कारवाईत ३ पीडित मुलींची सुटका करण्यात आली. मुलगी अल्पवयीन होती व तिने वेब सिरीजमध्ये काम केलेले असून दुसऱ्या मुलीने एका मराठी टिव्ही सिरियलमध्ये छोटीशी भूमिका केली आहे. तर तिसऱ्या मुलीने सावधान इंडिया या टिव्हीवरील मालिकेमध्ये काम केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले होते. या कारवाईमध्ये महिला दलालास अटक करण्यात आली.

टॅग्स :Sex Racketसेक्स रॅकेटProstitutionवेश्याव्यवसायPoliceपोलिसArrestअटकbollywoodबॉलिवूड