शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

दिल्लीच्या २९ वर्षीय 'ड्रग क्वीन' चा वेदनादायी अंत, जीव जाईपर्यंत चौथ्या पतीने झाडल्या तिच्यावर गोळ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2021 09:53 IST

शायनाच्या मृत्यूची बातमी सगळीकडे पसरताच लोकांना विश्वास बसला नाही. कारण या भागात तिची दहशत होती. पण तिच्या चौथ्या पतीनेच तिची हत्या केली होती.

राजधानी दिल्लीच्या हजरत निजामुद्दीन भागात मंगळवारी एका घटनेने खळबळ उडाली. परिसरात बातमी आगीसारखी पसरली की, एका व्यक्तीने शायना नावाच्या महिलेवर गोळ्या झाडून तिची हत्या केली. सोबतच तिचा नौकर शहादत याच्यावरही गोळ्या झाडल्या. घटनास्थळी पोलीस पोहोचले तेव्हा शायनाचा मृत्यू झाला होता. तर तिचा नोकर जखमी झाला होता. 

शायनाच्या मृत्यूची बातमी सगळीकडे पसरताच लोकांना विश्वास बसला नाही. कारण या भागात तिची दहशत होती. पण तिच्या चौथ्या पतीनेच तिची हत्या केली होती. पोलिसांना सीसीटीव्ह कॅमेरातून समजलं की, शायनाचा पती  वसीम यानेच तिच्यावर गोळ्या झाडल्या. यावेळी जेव्हा नोकर तिच्या बचावासाठी समोर आला तर वसीमने त्याच्यावरही गोळी झाडली. त्याच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. आता अनेकांना प्रश्न पडला आहे की, अखेर ही शायना आहे तरी कोण?  (हे पण वाचा : धक्कादायक! पत्नीच्या प्रियकराला पतीने हात-पाय तोडून फेकलं, दोन मुलांची आई त्याला सोडायला नव्हती तयार...)

२९ वर्षीय शायनाची ४ लग्ने

शायना दिल्लीच्या ड्रग विश्वातील एक मोठं नाव होतं. तिला दिल्लीतील ड्रग क्वीन असंही म्हटलं जात होतं. २९ वर्षीय शायनाने ४ लग्ने केली होती. पहिला आणि दुसरा पती तिला सोडून बांग्लादेशात गेले होते. त्यानंतर शायनाने दिल्लीतील ड्रग डीलर किंग शराफत शेखसोबत लग्न केलं. त्याला दिल्ली-एनसीआरमध्ये ड्रग लॉर्डच्या नावानेही ओळखलं जातं. वाढत्या वयामुळे शराफतला एका हुशार साथीदाराची गरज होती. त्यामुळे त्याने शायनासोबत लग्न केलं होतं. लग्नानंतर काही दिवसातच शराफतला पोलिसांनी तुरूंगात टाकलं होतं.

एक वर्षाआधी वसीमसोबत लग्न

शराफत शेख तुरूंगात गेल्यावर शायनाने १ वर्षाआधी वसीमसोबत लग्न केलं. दोघांचं लग्न होऊन काहीच वेळ झाला होता. अशात दिल्ली पोलिसांनी शायनाला ड्रग्स तस्करी प्रकरणी अटक केली. ड्रग्स तस्करी प्रकरणी आता शराफत शेख आणि त्याची पत्नी शायना दोघेही तिहाड तुरूंगात बंद होते.

तुरूंगातून आली होती बाहेर

शायना तुरूंगात असताना चौथा पती वसीमचं तिची मोठी बहीण रेहानासोबत सूत जुळलं. रेहाना आणि वसीम एकत्र राहू लागले होते. शायना ८ महिन्यांची गर्भवती होती. त्यामुळे तिला पॅरोलवर सोडण्यात आलं होतं. शायनाने तुरूंगातून बाहेर आल्यावर वसीमचं बदललेलं रूप पाहिलं. तो तिला ठीकपणे भेटायलाही आला नव्हता. अशात तिला खबर लागली की, वसीम आणि रेहाना यांच्यात प्रेम प्रकरण सुरू आहे. यावरून शायना आणि वसीममध्ये भांडण झालं. (हे पण वाचा : भयंकर! आईचा खून करताना पाहिल्यामुळे नराधम बापाने सात वर्षांच्या मुलालाही संपविले )

शायना ही प्रेमात आडकाठी ठरत असल्याचं पाहून वसीमने शायनाला नेहमीसाठी मार्गतून हटवण्याचा निर्णय घेतला. २७ एप्रिलच्या सकाळी १० वाजून ४० मिनिटाला शायना तिचा नोकर शहादतच्या घरासमोर बसली होती. तेव्हाच वसीमने तिथे येऊन आधी शहादतवर गोळी झाडली. त्यानंतर शायनावर ५ गोळ्या झाडल्या. त्याने सोबत दोन पिस्तुल आणल्या होत्या. एक खराब झाली तर दुसरीने गोळ्या झाडल्या. 

हे कृत्य करून वसीम थेट पोलीस स्टेशनमध्ये गेला आणि त्याने घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्याला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी वसीमचा आधी काहीही रे़कॉर्ड नाहीये. पोलीस हत्याकांडात रेहानाचा काय संबंध आहे याचा तपास करत आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीdelhiदिल्लीDrugsअमली पदार्थ