शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार

By दीपक शिंदे | Updated: September 19, 2024 23:57 IST

मुलावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क, शिरवळ: खंडाळा तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलाने घराच्या छतावर नेत चार वर्षीय मुलीवर अत्याचार केला. सूर्य दाखवतो, खाऊ देतो, पैसे देतो, असे सांगत अतिप्रसंग केला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी शिरवळ पोलिस स्टेशनला अल्पवयीन मुलाविरुद्ध बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोक्सो)अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिरवळ पोलिस स्टेशन हद्दीमध्ये एका गावात चार वर्षे अकरा महिन्यांची मुलगी कुटुंबीयांसमवेत राहते. दरम्यान, संबंधित कुटुंबाच्या शेजारी तेरा वर्षे पाच महिन्यांचा अल्पवयीन मुलगा खेळण्यासाठी आला होता. यावेळी संबंधित चार वर्षीय मुलगी खेळत असताना मुलाने लहान मुलीला तुला सूर्य दाखवतो, खाऊ देतो, असे सांगत टेरेसवर नेले. यावेळी संबंधितांच्या मागे एक दुसरा अल्पवयीन मुलगा आला. त्याला संबंधित मुलाने पाच रुपये देत खाऊ आण, असे सांगितल्याने संबंधित मुलगा हा दुकानामध्ये खाऊ आणण्यासाठी गेला. यावेळी तेरा वर्षीय अल्पवयीन मुलाने चार वर्षीय मुलीवर अतिप्रसंग केल्यानंतर संबंधित मुलीला त्रास होऊ लागल्याने ती ओरडली. त्यावेळी अल्पवयीन मुलाने संबंधित मुलीला गाडीचे हूक लागले आहे, असे सांग मी तुला खाऊ देतो, असे सांगत घटनास्थळावरून पलायन केले.

यावेळी खेळून थकल्यानंतर मुलगी रात्री झोपी गेली असता रात्री दहाच्या दरम्यान संबंधित मुलीला त्रास होऊ लागला. हा अतिप्रसंगाचा प्रकार असल्याचे मुलीच्या कुटुंबीयांच्या निदर्शनास आले. मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून अतिप्रसंग केल्याप्रकरणी तेरा वर्षीय मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक नयना कामठे करीत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरsexual harassmentलैंगिक छळPOCSO Actपॉक्सो कायदा