शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

धक्कादायक! : नागपूरमध्ये एकाच कुटुंबातील चार महिलांवर भोंदू मांत्रिकाचा बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2021 07:10 IST

या प्रकरणातील आरोपी हा निनावे पारडीत राहतो. त्याच भागात पीडित परिवार राहतो. पीडित मुलगी १७ वर्षांची असून, ती अकरावीत शिकते. तिच्या वडिलांची आरोपी निनावेसोबत २०१८पासून मैत्री होती. त्यामुळे तो या कुटुंबातील सदस्यांना कधी-कधी अंगारे, धुपारे करायचा. 

नागपूर : भूतबाधेचा धाक दाखवून उपचाराच्या नावाखाली भोंदू मांत्रिकाने अल्पवयीन मुलगी, तिची आई, मामी आणि आजी अशा चाैघींवर सात महिन्यात अनेकदा बलात्कार केला. ही खळबळजनक घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी धर्मेंद्र विठोबा निनावे उर्फ दुलेवाले बाबा (५०) या मांत्रिकाला अटक केली आहे. या प्रकरणातील आरोपी हा निनावे पारडीत राहतो. त्याच भागात पीडित परिवार राहतो. पीडित मुलगी १७ वर्षांची असून, ती अकरावीत शिकते. तिच्या वडिलांची आरोपी निनावेसोबत २०१८पासून मैत्री होती. त्यामुळे तो या कुटुंबातील सदस्यांना कधी-कधी अंगारे, धुपारे करायचा. कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याच्या काळात (मे २०२०) पीडित मुलीची प्रकृती वारंवार बिघडू लागली. त्यामुळे मांत्रिक निनावेने तिला आपल्या दरबारात आणायला सांगितले. त्याने अंगात आल्याचा बनाव करून मुलीला भयंकर भूतबाधा झाल्याचे सांगितले. त्यानंतर अंगारे-धुपारे, गुंगीचे औषध देऊन रात्रीच्या वेळी निर्जन ठिकाणी नेऊन तो ‘विधीच्या नावाखाली’ मुलीवर बलात्कार करू लागला. हे करतानाच त्याने एक दिवस मुलीच्या आईवरही बलात्कार केला. एक दिवस त्याने पूजेच्या नावाखालीच मुलीच्या मामीच्या घरी जाऊन तिच्यावरही बलात्कार केला. नंतर मुलीच्या ६० वर्षीय आजीसोबतही त्याने हे दुष्कृत्य केले. 

 

अखेर पाप उजेडात आले -- डिसेंबर अखेरपर्यंत त्याचे हे कुकर्म सुरू होते. चाैघीही लज्जेखातर एकमेकींना हा प्रकार सांगत नव्हत्या. मात्र, एक दिवस तो बलात्कार करताना दुसरीला दिसला. ते बघून त्याने आपल्यासोबतही असेच केल्याचे पीडितेला सांगितले. नंतर मामी अन् आजीसोबत चर्चा झाली असता, त्याने आपल्यावरही अत्याचार केल्याचे सांगितले. - गेल्या आठवड्यात पीडित परिवाराने पारडी पाेलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. आरोपीला अटक करून आठ दिवस झाले तरीही पारडी पोलिसांनी या संतापजनक प्रकरणाचे वृत्त बाहेर कळणार नाही, याची पुरेपूर काळजी घेतली.

टॅग्स :Rapeबलात्कारMolestationविनयभंगnagpurनागपूर