शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

दाभोलकर हत्येच्या तपासाबाबत निष्कर्षासाठी CBI मुख्यालयाला चार आठवड्यांची मुदत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2023 07:44 IST

दाभोलकर हत्या प्रकरणाचा तपास उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली सुरू राहावा, यासाठी दाभोलकर यांची मुलगी मुक्ता दाभोलकर यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

मुंबई : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येसंबंधीचा तपास पूर्ण झाल्यासंबंधीचा अहवाल सीबीआयच्या तपास अधिकाऱ्याने दाखल केला आहे. मात्र, अहवाल स्वीकारायचा की नाही, यावर निर्णय घेण्यासाठी उच्च न्यायालयाने सीबीआय मुख्यालयाला चार आठवड्यांची मुदत दिली.

दाभोलकर हत्या प्रकरणाचा तपास उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली सुरू राहावा, यासाठी दाभोलकर यांची मुलगी मुक्ता दाभोलकर यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. न्या. अजय गडकरी व न्या. प्रकाश नाईक यांच्या खंडपीठापुढे या याचिकेवर सुनावणी होती. सीबीआयने अद्याप मोटारसायकल व शस्त्रे जप्त केली नाहीत आणि २०१९ मध्ये सीबीआयने दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्रात तपास सुरू असल्याचे म्हटले आहे, असा युक्तिवाद मुक्ता यांच्यावतीने ॲड. अभय नेवगी यांनी न्यायालयात केला.

३० जानेवारीच्या सुनावणीत सीबीआयच्यावतीने अतिरिक्त महान्यायअधिकर्ता अनिल सिंग यांनी न्यायालयाला सांगितले  की, तपास अधिकाऱ्याने तपास पूर्ण केला असून तसा अहवाल सीबीआय मुख्यालयाला पाठविला आहे. याबाबत वरिष्ठ अधिकारी निर्णय घेतील.सुनावणीत सीबीआयतर्फे ॲड. संदेश पाटील यांनी न्यायालयाला सीबीआयच्या मुख्यालयाने मुंबईच्या सीबीआय कार्यालयाशी केलेला पत्रव्यवहार दाखविला. त्यानंतर न्यायालयाने सीबीआय मुख्यालयाला  निर्णय घेण्यासाठी आणखी किती वेळ लागणार? अशी विचारणा यांच्याकडे केली. सीबीआयला निर्णय घेण्यासाठी आणखी चार आठवडे लागतील. त्यानंतरच चित्र स्पष्ट होईल, असे पाटील यांनी न्यायालयाला सांगितले.

आरोपींचा अर्जाला विरोधमुक्ता दाभोलकरांच्या अर्जाला दोन आरोपींनी विरोध केला आहे. विक्रम भावे आणि वीरेंद्रसिंह तावडे या दोन आरोपींनी अर्जात म्हटले आहे की, पुण्यात खटला सुरू आहे आणि आतापर्यंत १० साक्षीदारांची साक्ष  नोंदविण्यात आली आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाने तपासावर देखरेख ठेवण्याची आवश्यकता नाही. 

आरोपीचे वकील म्हणाले...सीबीआयला पुढे तपास करायचा असेल तर त्यांनी पुणे न्यायालयाला सांगावे, असे आरोपींचे वकील घनश्याम उपाध्याय यांनी न्यायालयाला सांगितले.

न्यायालय म्हणाले...‘सीबीआयला अहवाल सादर करण्यासाठी ४ आठवड्यांची मुदत देत आहोत. त्यानंतरच तपासावर देखरेख ठेवायची की नाही, याबाबत निर्णय घेऊ,’ असे न्यायालयाने स्पष्ट केले.

टॅग्स :Narendra Dabholkarनरेंद्र दाभोलकरCBIगुन्हा अन्वेषण विभाग