शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकाच्या आत्महत्येप्रकरणी चार शिक्षकांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2019 23:37 IST

पूर्वेकडील परिसरात असलेल्या एका क्लासमध्ये भागीदारी देतो असे सांगून एका शिक्षकाकडून लाखो रुपये तर घेतले पण त्याला भागीदारी न देता त्याची फसवणूक केली.

नालासोपारा : पूर्वेकडील परिसरात असलेल्या एका क्लासमध्ये भागीदारी देतो असे सांगून एका शिक्षकाकडून लाखो रुपये तर घेतले पण त्याला भागीदारी न देता त्याची फसवणूक केली. तसेच त्याने पैसे परत मागितल्यावर पोलीस ठाण्यात खोटे गुन्हे दाखल करून बदनामी करण्याची धमकी दिल्याने संबंधित शिक्षकाने मानसिक दबावाखाली येत वसईत लोकलखाली उडी मारून आत्महत्या केली. वसई रेल्वे पोलिसांनी त्यावेळी अपघाती मृत्यूची नोंद करून हा गुन्हा अधिक तपासासाठी तुळींज पोलिसांकडे वर्ग केला होता. मृत शिक्षकाच्या भावाच्या तक्रारीच्या आधारे तसेच पोलिसांनी संपूर्ण चौकशी केल्यानंतर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चार शिक्षकांविरूद्ध गुरुवारी गुन्हा दाखल केला आहे. ज्याने आत्महत्या केली त्या शिक्षकाचे ३० नोव्हेंबरला लग्न होणार होते. पण दुर्दैवाने त्याआधीच त्याचा मृत्यू झाला.नालासोपारा पूर्वेकडील आचोळे रोडवरील चंद्रेश दर्शन इमारतीत राहणारे आशुतोष हनुमंत सिंह (२७) यांना मे, जून २०१९ ते ८ नोव्हेंबर २०१९ या दरम्यान पीव्हीआर क्लासेसमध्ये भागीदारी देण्याचे आमिष दाखवून राहुल बसंतीलाल जैन, वैभव अवस्थी, नरसिंग उर्फ परमार आणि प्रमोद मोरे या चौघांनी आशुतोषकडून २० लाख रुपये घेतले. नंतर त्याला ना भागीदारी दिली ना दिलेले पैसेही परत केले. उलट त्याने पैशाची मागणी केली तर या चौघांनी पोलीस ठाण्यात खोटे गुन्हे दाखल करू, अशी धमकी दिली. शिवाय, दुसऱ्या क्लासेसमध्ये काम मिळणार नाही आणि बदनामी करू असेही सांगितले.यामुळे आशुतोष मानसिक दबावाखाली आले आणि त्यांनी ८ नोव्हेंबर रोजी वसई रेल्वे स्थानकात हॉलिडे एक्स्प्रेस या गाडीसमोर उडी मारून आत्महत्या केली. या आत्महत्येस हे चौघे जवाबदार असल्याचे भाऊ संदीप हनुमंत सिंह (२९) याने सांगत तुळींज पोलीस ठाण्यात गुरु वारी तक्र ार देऊन गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीVasai Virarवसई विरार