शहरं
Join us  
Trending Stories
1
तालिबान-पाकिस्तानमध्ये पुन्हा युद्ध, कुर्रममध्ये टँक नष्ट, चौक्या ताब्यात, दोन टीटीपी कमांडर पाकिस्तानविरुद्ध एकत्र आले
2
राजकीय पक्षांचे दार चुकले; मतदार याद्यांचा विषय कक्षेत नाही; राजकीय प्रतिनिधींना आयोगाचे उत्तर
3
५ वर्षात ₹१७ लाखांचा रिटर्न; पैसा छापायची मशीन आहे पोस्टाची 'ही' स्कीम, बनवेल लखपती
4
सिलिंडरच्या स्फोटात भाजली, ११ दिवस मृत्यूशी झुंज; भारतीची शेवटची इच्छा वाचून पाणावतील डोळे
5
रशियाचा युक्रेनवर मोठा हल्ला, रुग्णालय आणि वीज प्रकल्पाचे मोठे नुकसान; सात जण जखमी
6
दिवाळीत वैभव लक्ष्मी योग: ९ राशींवर महाकृपा, धन-संपत्ती-लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, यश-शुभ काळ!
7
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, निफ्टीत ८० अंकांची तेजी; NBFC शेअर्समध्ये जोरदार तेजी
8
अग्नितांडव! बांगलादेशच्या ढाकामध्ये कपड्याच्या फॅक्ट्रीला भीषण आग; १६ कामगारांचा होरपळून मृत्यू
9
आजचे राशीभविष्य, १५ ऑक्टोबर २०२५: सरकारी कामात यश, हाती पैसा येईल; चांगली बातमी मिळेल
10
भयंकर! शाळेत चप्पल घातल्याने मुख्याध्यापिका संतापली; कानाखाली मारली, विद्यार्थिनीचा मृत्यू
11
ना शिधा, ना आनंद! भुजबळांनी ते धाडस दाखविले...
12
भारत-पाकच्या खेळाडूंमध्ये ‘हाय फाइव्ह’; हॉकी संघाने सामना संपल्यानंतर हस्तांदोलनही केले
13
मुंबई महापालिका निवडणूक मतपत्रिकेवर घेण्याची मागणी; राज, उद्धव ठाकरेंसह शरद पवारांची मागणी
14
बापरे, काय तो वेग...! बुलेट, रॉकेटचा नाही तर चांदीचा; एकाच दिवसात १५,००० ने वाढली 
15
ईडी कारवाई: वसईचे माजी आयुक्त अनिल पवार, गुप्ताची ७१ कोटींची मालमत्ता जप्त
16
पानसरे हत्या; तीन आरोपींना जामीन मंजूर; सर्वच आरोपी आता जामिनावर बाहेर
17
माओवादी चळवळीने हात टेकले; ‘भूपती’सह ६० जणांची शरणागती
18
इंधन भेसळ प्रकरणात जामीन देताना गंभीरतेने विचार गरजेचा; मुंबई उच्च न्यायालयाचे स्पष्ट मत, एकाचा जामीन फेटाळला
19
कोल्डरिफसह तीन विषारी सिरप वापरू नका, जिवाला असलेला धोका टाळा
20
धारदार शस्त्राने गळा चिरून तरुणाची हत्या; इतर मद्यपींनी पाहिले अन् तिकडे धाव घेतली...

कोईम्बतूर येथून इसिसशी संबंध असलेल्या संशयित चारजणांना अटक   

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2019 19:45 IST

इसिस या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून चारजणांना एनआयएने अटक केली आहे. 

ठळक मुद्देराष्ट्रीय तपास यंत्रणाने (एनआयए) आज तामिळनाडूतील कोईम्बतूर येथे विविध ठिकाणी सकाळपासून छापेमारी केली. , एनआयएची टीम काही दिवसांपूर्वी आयएसच्या संशयितांची माहिती घेण्यासाठी श्रीलंकेला गेली होती.

तामिळनाडू - श्रीलंकेत ‘इस्टर डे’ च्या दिवशी घडलेल्या बॅाम्बस्फोट प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणाने (एनआयए) आज तामिळनाडूतील कोईम्बतूर येथे विविध ठिकाणी सकाळपासून छापेमारी केली. मिळालेल्या माहितीनुसार इसिस या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून चारजणांना एनआयएने अटक केली आहे. 

श्रीलंकेत झालेल्या बॉम्ब हल्ल्याप्रकरणी एनआयएने तामिळनाडूतील तीन संशयितांच्या घरावर छापा टाकला आहे. आज सकाळी सहा वाजता कोच्चीहून एनआयएचे अधिकारी कोईम्बतूरला पोहोचले. त्यानंतर ठिकठिकाणी छापेमारी केली. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एनआयएच्या अधिकाऱ्यांनी पोथनूरमध्ये अझरुद्दीन उक्कदम, सद्दाम, अकबर यांच्यासह कुणियामथूरमध्ये अबुबकर सिद्दीक आणि अल अमीम कॉलोनीत इधियाथुल्ला यांच्या घरावर छापा टाकला असून चौकशी सुरु आहे.

श्रीलंकेत झालेल्या बॉम्ब हल्ल्यानंतर भारत आणि श्रीलंकने पाच संशयितांचे फोन नंबर शेअर करण्यात आले होते. या संशयितांचा संबंध  दहशतवादी संघटनेशी असल्याचे सांगण्यात येत आहे. भारताने सुद्धा काही अशा लोकांचे नंबर शेअर केले होते, जे श्रीलंकेतील दोन फिदायिनांच्या कुटुंबियांच्या संपर्कात होते. दरम्यान, एनआयएची टीम काही दिवसांपूर्वी आयएसच्या संशयितांची माहिती घेण्यासाठी श्रीलंकेला गेली होती. या माहितीच्या आधारावर एनआयएच्या अधिकाऱ्यांनी आज कोयंबत्तूरमध्ये छापेमारी केली असून यासंबंधी तपास सुरु केला आहे.

 

टॅग्स :ArrestअटकTerrorismदहशतवादISISइसिसNIAराष्ट्रीय तपास यंत्रणा