नालासोपारा - वसई तालुक्यातील परिसरात रात्रीच्या वेळी घरफोडी आणि चोरी करणाऱ्या चार जणांच्या टोळीला एलसीबीच्या वसई पथकाने रविवारी रात्री पकडले आहे. अस्लम शौकत शेख (22), मंगेश वामन जाधव (31), युसूफ युनूस अन्सारी (24) आणि पिंट्या विठ्ठल गुणगुणे (24) ही पकडलेल्या चोरांची नावे असून दोघे विरार परिसरातील तर दोघे वाडा परिसरात राहणारे आहे.विरार पूर्वेकडील मनवेल पाडा परिसरात चोरी करण्यासाठी काही चोर येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर एलसीबीच्या वसई पथकाने चार जणांच्या टोळीला पकडले आहे. या चोघांनी वालीव पोलीस ठाण्याच्या परिसरातील चिंचोटी गावातील पाटीलपाडा येथे अब्दुल नदीम सिद्धीकी (33) यांच्या घरी 4 मे रोजी 45 हजार रुपये किंमतीचे सोन्याचांदीचे दागिने व मोबाईल चोरी करून घरफोडी केली असल्याचे तपासात कबूल केले असून वाडा परिसरातील महावितरणचे ट्रान्सफार्मर चोरी केल्याप्रकरणी या चारही जणांविरुद्ध वाडा पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहे.
चोऱ्या करणारे चार अट्टल चोरटे गजाआड
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2019 18:44 IST
अस्लम शौकत शेख (22), मंगेश वामन जाधव (31), युसूफ युनूस अन्सारी (24) आणि पिंट्या विठ्ठल गुणगुणे (24) ही पकडलेल्या चोरांची नावे
चोऱ्या करणारे चार अट्टल चोरटे गजाआड
ठळक मुद्दे4 मे रोजी 45 हजार रुपये किंमतीचे सोन्याचांदीचे दागिने व मोबाईल चोरी करून घरफोडी केली चारही जणांविरुद्ध वाडा पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहे.