शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

जळगावमध्ये चार पोलीस तडकाफडकी निलंबित, धाडीतील लाखोंची रक्कम गायब केल्याचा ठपका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2019 23:16 IST

धरणगाव शहरातील उच्चभ्रू वस्तीतील घरात सुरु असलेल्या पत्त्याच्या क्लबवर अक्षयतृतीयेच्या पूर्वसंध्येला टाकलेल्या धाडीतील लाखो रुपये गायब झाले होते.

जळगाव - धरणगाव शहरातील उच्चभ्रू वस्तीतील घरात सुरु असलेल्या पत्त्याच्या क्लबवर अक्षयतृतीयेच्या पूर्वसंध्येला टाकलेल्या धाडीतील लाखो रुपये गायब झाले होते. या प्रकरणी ठपका ठेवत चार पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी शनिवारी सायंकाळी ही धडक कारवाई केली.   एकाच वेळी चार कर्मचारी  निलंबित झाल्यामुळे  पोलीस दलात  खळबळ उडाली आहे. 

शिवाजी बाविस्कर ( धरणगाव ), संतोष पारधी, (चोपडा शहर) , हितेश बेहरे (चोपडा ग्रामीण) आणि तुषार साळुंखे (वाहन चालक, चोपडा उपविभागीय कार्यालय) अशी निलंबित कर्मचाºयांची नावे आहेत. धरणगाव तसेच चोपडा शहरातील चार आणि अडावद येथील एका ठिकाणी अक्षय तृतीयेच्या पूर्वसंध्येला पोलिसांनी  धाड टाकली होती. धरणगावच्या धाडीत साधारण १० ते १५ लाखांची रोकड आढळली होती.  मात्र या गुन्ह्यात अवघे पावणे तीन लाख जप्त झाल्याचे दाखविण्यात आले.  उर्वरित रक्कमेबाबतची माहिती समोर येत नसल्यामुळे संशय व्यक्त केला जात होता.    या  प्रकरणाविषयी तक्रार आल्यानंतर डीवायएसपी सौरभ अग्रवाल यांनी  चौकशी केली आणि हवाल पाठविला होता.  त्यावर ही कारवाई करण्यात आली.

टॅग्स :PoliceपोलिसJalgaonजळगाव