कोयता, बंदुकीचा धाक दाखवित चार जणांनी ऐवज लुटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 18:37 IST2019-05-17T18:32:03+5:302019-05-17T18:37:31+5:30
कोयता व बंदुकीचा धाक दाखवून ४५ हजार रुपये किंमतीची सोनसाखळी, १५ हजारांची रोकड व एक लॅपटॉप असा माल लंपास केला.

कोयता, बंदुकीचा धाक दाखवित चार जणांनी ऐवज लुटला
पिंपरी : कोयता व बंदुकीचा धाक दाखवित चार जणांनी हॉटेलमधील ७० हजार रुपये किंमतीचा ऐवज लुटला. याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ताथवडे येथे गुरुवारी घडली.याप्रकरणी राहुल प्रसाद मापारी (वय ३२, रा. गंगासाईप्रेस सोसायटी, ताथवडे) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फियार्दी मापारी यांचे ताथवडे येथील अश्विनी स्कूलजवळील पलाडिओ सोसायटीसमोर कबाब अॅण्ड बिर्याणी कॉर्नर हॉटेल या नावाचे हॉटेल आहे. गुरुवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास ते हॉटेल बंद करत असताना रिक्षातून अज्ञात चारजण त्यांच्या हॉटेलमध्ये आले. त्यांनी मापारी व हॉटेलमध्ये काम करणाऱ्या आचाऱ्यास जीवे मारण्याची धमकी दिली. कोयता व बंदुकीचा धाक दाखवून ४५ हजार रुपये किंमतीची सोनसाखळी, १५ हजारांची रोकड व एक लॅपटॉप असा ७० हजार रुपये किंमतीचा माल लंपास केला. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस अधिक तपास करत आहेत.