तुमसर (भंडारा) : आपसी वैमनस्यातून एका सराईत गुंडावर गाेळी झाडण्याची घटना तुमसर येथील आंबेडकर वाॅर्डात मंगळवारी दुपारी २.१५ वाजता घडली. यात गंभीर जखमी झालेल्या गुडाला भंडाराच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्याच्या छातीला गाेळी लागल्याचे सांगण्यात आले.संताेष चंदन दहाट (२८) रा. आंबेडकर वाॅर्ड तुमसर असे जखमी तरुणाचे नाव आहे. दुपारी २.१५ वाजताच्या सुमारास तरुणाच्या टाेळक्यांनी संताेषवर चार गाेळ्या झाडल्या. त्यातील तीन गाेळ्या हुकल्या मात्र एक गाेळी त्याच्या छातीत लागली. तसेच त्याच्या मानेवर चाकुने वार केल्याचेही सांगण्यात आले. घटनास्थळावर काेसळलेल्या संताेषला तात्काळ प्रथम तुमसर व नंतर भंडाराच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती हाेताच तुमसर पाेलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली. बघ्यांची माेठी गर्दी झाली हाेती.
चार गोळ्या झाडल्या तीन हुकल्या तर एक छातीत लागली, सराईत गुंड गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2021 15:08 IST
Firing : तुमसर येथे गाेळीबार
चार गोळ्या झाडल्या तीन हुकल्या तर एक छातीत लागली, सराईत गुंड गंभीर जखमी
ठळक मुद्देसंताेष चंदन दहाट (२८) रा. आंबेडकर वाॅर्ड तुमसर असे जखमी तरुणाचे नाव आहे.