शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

राधिकाच्या पाठीत नाही तर छातीत मारल्या चार गोळ्या; वडिलांना दिलेली कबुली पोस्टमॉर्टम रिपोर्टपेक्षा वेगळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 18:54 IST

हरियाणाच्या टेनिसपटूच्या हत्या प्रकरणात शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Tennis player Radhika Yadav Death: गुरुग्राममधील पॉश भागात असलेल्या सुशांत लोकमधील टेनिसपटू राधिका यादवच्या हत्येने खळबळ उडाली. राधिका जेवण बनवत असताना तिचे वडील दीपक यादव यांनीच तिच्यावर गोळ्या झाडल्या. टेनिस अकादमी सुरु करण्यावरुन आणि रील्स बनवण्यावरुन दीपक यादव नाराज होता. गावकऱ्यांच्या टोमण्यांनी वैतागल्यामुळे मी राधिकाची हत्या केली असं दीपक यादवने सांगितले. मात्र आता राधिकाच्या शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

टेनिसपटू राधिका यादवची तिच्याच वडिलांनी हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. गुरुवारी सकाळी राधिकाच्या वडिलांनी तिच्यावर गोळ्या झाडल्या ज्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. राधिकाचा शवविच्छेदन अहवालही समोर आला आहे. राधिकाच्या हत्येबद्दल केल्या जाणाऱ्या दाव्यांपेक्षा शवविच्छेदन अहवालातून वेगळीच माहिती समोर आली आहे. या अहवालानुसार, राधिकाच्या शरीरातून चार गोळ्या काढण्यात आल्या आणि चारही गोळ्या तिच्या छातीत लागल्या होत्या. मात्र याआधी  राधिकाच्या वडिलांनी मागून गोळ्या झाडल्या होत्या आणि त्यापैकी तीन गोळ्या तिच्या पाठीवर लागल्या असा दावा केला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, राधिकाच्या वडिलांनी स्वतः आपला गुन्हा कबूल केला आणि सांगितले की मी राधिकावर तीन गोळ्या झाडल्या. पण आता शवविच्छेदन अहवालानंतर दीपक यादवने दिलेल्या कबुलीजबाबावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. मी राधिकाच्या कमाईवर अवलंबून असल्याने मला अनेकदा टोमणे मारले जात होते, असं दीपक यादवने सांगितले. पोलिसांनी सांगितले की, दीपक राधिकावर टेनिस अकादमी चालवल्याबद्दलही रागावला होता. दीपकने अनेक वेळा राधिकाला अकादमी बंद करण्यास सांगितले होते, पण तिने ऐकले नाही. रागाच्या भरात दीपकने राधिकावर तीन गोळ्या झाडल्या.

राधिकाची हत्या तिच्या घराच्या पहिल्या मजल्यावर झाली. त्यावेळी तिची आई, वडील आणि राधिका घरीच होते. काका कुलदीप त्यांच्या कुटुंबासह तळमजल्यावर राहत होते. घटनेच्या वेळी राधिकाचा भाऊ ऑफिसमध्ये होता. मोठा आवाज ऐकू आला आणि मी वरच्या मजल्यावर धावत गेलो. राधिका रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती. माझा मुलगाही वरच्या मजल्यावर आला, असं राधिकाच्या काकांनी सांगितले. दोघांनीही राधिकाला त्यांच्या गाडीतून रुग्णालयात नेले जिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHaryanaहरयाणाPoliceपोलिस