शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

किवळेत वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या चौघांना अटक; १२ मुलींची सुटका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2018 20:15 IST

किवळे येथील साई लॉज येथे वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने या लॉजवर छापा टाकून १२ मुलींची सुटका केली.

ठळक मुद्देगुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाची कारवाई 

पिंपरी : किवळे येथील साई लॉज येथे वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती मिळाल्यानंतर पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने या लॉजवर छापा टाकून १२ मुलींची सुटका केली. तसेच एकूण आठ जणांवर गुन्हे दाखल केले असून चौघांना अटक केली आहे. ही कारवाई गुरुवारी करण्यात आली. हरीश सिन्ही शेट्टी (वय ४६), अभिषेक मोहन शेट्टी (वय ३२, दोघे रा. साई लॉज, किवळे), रत्नाबहाद्दूर रनबहाद्दूर प्रधान (वय ३४, रा. भोंडवेवस्ती, रावेत), बालाजी रामराव माने (वय २५, रा. सोमाटणे फाटा), लॉजचे मालक शेखर दीपक सांडभोर (रा. किवळे), प्रविण शेट्टी (रा. साई लॉज, किवळे), सागर भोंडवे, विनोद सदानंद शर्मा (दोघे रा. भोंडवेवस्ती, रावेत) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी हरीश, अभिषेक, रत्नाबहाद्दूर आणि बालाजी यांना अटक केली असून इतर चौघेजण फरार आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेच्या काही कर्मचाऱ्यांनी साई लॉज येथे जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांची माहिती मिळविली. त्यानंतर येथे छापा टाकून तीन मुलींची सुटका केली. तसेच हरीश आणि अभिषेक यांना अटक केली. त्या दोघांकडे चौकशी करत वेश्या व्यवसाय सुरु असलेल्या ठिकाणची माहिती काढली. त्यानुसार भोंडवेवस्ती मधील मुस्कान फर्निचर दुकानाच्या मागच्या बाजूला या मुली राहत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकून नऊ मुलींची सुटका केली. तसेच या मुलींची ने-आण करणाऱ्या बालाजी आणि शेखर यांना अटक केली.  शेखर,  प्रवीण,  सागर,  विनोद हे चौघेजण अद्याप फरार आहेत. या कारवाईत एक मोटार, दोन दुचाकी असा एकूण २ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडkiwaleकिवळेsex crimeसेक्स गुन्हाPoliceपोलिसArrestअटक