शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

१४ कोटींचे चरस जप्त करत चौघांना अटक; श्रीनगरहून कारमधून मुंबईत आणले ड्रग्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2021 15:11 IST

Charas seized in mumbai : पोलिसांना याची माहिती मिळाली आणि सर्व आरोपी पोलिसांच्या तावडीत सापडले.

ठळक मुद्दे सर्व आरोपी हे पवईचे रहिवासी आहेत. ही टोळी मुंबईतच नव्हे तर महाराष्ट्रात ड्रग्जचा पुरवठा करते.

श्रीनगरहून कारमधून मुंबईत ड्रग्ज आणणाऱ्या एका टोळीचा मुंबईपोलिसांनी पर्दाफाश केला आहे. जे शहरातील अनेक भागात ड्रग्जचा पुरवठा करतात. या टोळीत पुरुषांसोबत महिलांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे हे लोक जम्मू-काश्मीरमधून ड्रग्ज आणून मुंबईत विकायचे.मुंबई क्राईम ब्रँचच्या ताब्यात असलेले हे सर्वजण मुंबईचे मोठे ड्रग्ज सप्लायर आहेत. ही टोळी मुंबईतच नव्हे तर महाराष्ट्रात ड्रग्जचा पुरवठा करते. आजही ही टोळी श्रीनगरमधून २४ किलो चरस आणून मुंबईला पुरवणार होती. मात्र पोलिसांना याची माहिती मिळाली आणि सर्व आरोपी पोलिसांच्या तावडीत सापडले.

अटक करण्यात आलेल्या टोळीकडून पोलिसांनी २४ किलो चरस जप्त केला आहे. ज्याची किंमत सुमारे १४ कोटी ४० हजार आहे. विशेष बाब म्हणजे ड्रग्जची ही खेप एका सेंट्रो कारमधून श्रीनगरहून मुंबईत आणण्यात आली होती. सर्व आरोपी हे पवईचे रहिवासी आहेत. 

 

 

टॅग्स :Drugsअमली पदार्थPoliceपोलिसMumbaiमुंबईArrestअटकAnti Narcotic Cellअमली पदार्थविरोधी पथक