पिंपरी : पूर्वीच्या भांडणाच्या कारणावरून कोयत्याने वार करून तरुणाचा खून केला. थेरगाव येथे शुक्रवारी (दि. ५) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास हा प्रकार घडला होता. याप्रकरणी चार आरोपींना १२ तासांत जेरबंद करण्यात आले आहे. वाकड पोलिसांनी ही कारवाई केली.गुड्ड्या उर्फ किशोर ज्ञानदेव शेलार (रा. लिंक रोड, चिंचवड), सिजीन फिलिप जार्ज (वय २६, रा. काळेवाडी), रोहीत ललन सिंग (वय २२, रा. पवनानगर कॉलनी क्र. २, काळेवाडी), सचिन सोनू साठे (वय २६, रा. गणराज कॉलनी, काळेवाडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. ऋषभ गायकवाड (वय १८), असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर प्रमोद किसन गायकवाड (रा. जगतापनगर, थेरगाव) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा चुलत भाऊ ऋषभ गायकवाड आणि आरोपी यांच्यात पूर्वी भांडण झाले होते. त्या कारणावरून बदला घेण्याच्या उद्देशाने शुक्रवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास थेरगाव येथील जगतापनगरमध्ये आरोपी यांनी धारदार कोयत्याने ऋषभ याच्यावर जबर वार करून व दगडाने मारून जीवे ठार मारले. याबाबत वाकड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणातील आरोपींच्या शोधासाठी वाकड पोलिसांची तीन पथके तयार करण्यात आली होती. आरोपींचा माग काढून १२ तासांत आरोपींना अटक करण्यात आली आहे.वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, सहायक पोलीस निरीक्षक हरिश माने, महेश स्वामी, अविनाश पवार, तानाजी भोगम, पोलीस उपनिरीक्षक सिद्धनाथ बाबर, प्रणिल चौगुले, शंभु रणवरे, पोलीस कर्मचारी बिभीषण कन्हेरकर, विक्रम जगदाळे, बापुसाहेब धुमाळ, जावेद पठाण, बाबाजान इनामदार, सुहास पाटोळे, प्रमोद भांडवलकर, विक्रम कुदळ, विजय गंभीरे, नितीन गेंगजे, सुरज सुतार, शाम बाबा, नितीन ढोरजे, दिपक भोसले, प्रमोद कदम, सचिन नरुटे, तात्या शिंदे, प्रशांत गिलबिले, अभिमन्यु बसनोडे, अन्वर मोमीन, अमोल दातार, सचिन जाधव, देवा वाघमारे, मोहिनी थोपटे, नुतन कोंडे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
पूर्वीच्या भांडणावरून तरुणाचा खून करणारे चौघे १२ तासांत जेरबंद; थेरगाव येथील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2020 16:41 IST
थेरगाव येथील जगतापनगरमध्ये आरोपी यांनी धारदार कोयत्याने ऋषभ याच्यावर जबर वार करून व दगडाने मारून जीवे ठार मारले.
पूर्वीच्या भांडणावरून तरुणाचा खून करणारे चौघे १२ तासांत जेरबंद; थेरगाव येथील घटना
ठळक मुद्दे पोलिसांनी आरोपींना केली अटक