शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकी चोरणाऱ्या दोन गुन्ह्यातील चार आरोपींना अटक, गुन्हे शाखेची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2023 15:51 IST

गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पथकाची कामगिरी

नालासोपारा (मंगेश कराळे) :- विरार व अर्नाळा पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीच्या दोन गुन्ह्यातील चार आरोपींना गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पथकाने अटक केल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी प्रवीण बनगोसावी यांनी दिली आहे. विरार स्टेशन जवळील पे अँड पार्क मधून दुचाकी चोरी झाल्याप्रकरणी ४ ऑगस्टला विरार पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. तर न्यू विवा कॉलेजच्या परिसरातून दुचाकी चोरी झाल्याने अर्नाळा पोलिसांनी ५ ऑगस्टला गुन्हा दाखल केला होता.

दोन्ही दाखल गुन्ह्यांचे उपलब्ध सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाद्वारे तपास करून अर्नाळा येथील गुन्ह्यामध्ये आरोपी मामुन चौधरी (२०) आणि अनुराग सिंग (१९) तर विरारच्या गुन्ह्यामध्ये आरोपी ग्लेन कॅस्टेलिनो (२४) आणि पीटर कॅस्टेलिनो (३१) यांना ताब्यात घेतले. गुन्ह्याचा अनुषंगाने करण्यात आलेल्या तपासामध्ये मामुन आणि अनुराग या दोघांनी मौजमजा करण्यासाठी दुचाकी चोरली आहे. तर ग्लेन आणि पीटर या दोन्ही सख्या भावांनी स्वतःच्या दुचाकीमध्ये दुसऱ्या दुचाकीचे पार्ट लावण्यासाठी चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. दोन्ही गुन्ह्यातील चोरी करण्यात आलेल्या २ लाख २० हजार रुपये किंमतीच्या दोन्ही दुचाकी आरोपींकडून हस्तगत करण्यात आल्या आहेत. 

सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे, सहायक पोलीस आयुक्त अमोल मांडवे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख, पोलीस उपनिरीक्षक उमेश भागवत, भुपेंद्र टेलर, पोलीस हवालदार अशोक पाटील, मनोज चव्हाण, मुकेश तटकरे, सचिन घेरे, सागर बारावकर, मनोज सकपाळ, अश्विन पाटील, राकेश पवार, सुमित जाधव, सुनील पाटील, युवराज वाघमोडे, सागर सोनवणे, गणेश यादव आणि संतोष चव्हाण यांनी पार पाडली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMumbaiमुंबईPoliceपोलिस