शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

खंडणीसाठी तरुणाची हत्या, चार आरोपींना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2019 19:44 IST

रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरुणाला चारचाकी वाहनाने दोन ते तीन तालुक्यात फिरवून त्यानंतर रात्री खून करून मृतदेह वाघदीच्या पाण्यात टाकण्यात आला. 

गोंदिया : खंडणीसाठी २० वर्षाच्या तरुणाचे अपहरण करून त्याची हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. सौरभ मोरेश्वर कटारे (२०) रा. गोंदिया असे मृत तरुणाचे नाव आहे. खंडणीसाठी अपहरण करण्यात आल्यानंतर सदर तरुणाने आरोपीला ओळखल्याने त्याच्या डोक्यात बिअरच्या बाटलीने वार करून गंभीर दुखापत करण्यात आली. त्यानंतर दुपारी २.३० वाजतापासून रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरुणाचा १२ तास तडफडून त्याचा मृत्यू झाला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरुणाला चारचाकी वाहनाने गोंदिया जिल्ह्यातील दोन ते तीन तालुक्यात फिरवून त्यानंतर रात्री खून करून मृतदेह वाघदीच्या पाण्यात टाकण्यात आला. खंडणीसाठी मृत तरुणाचा नातेवाईक (आतेभाऊ) अंकित राधेशाम बिरनवार (२१) रा.कमरगाव गोरेगाव याने १५ डिसेंबरच्या दुपारी फोन करून सौरभला गोंदियाच्या मनोहरभाई पटेल अभियांत्रीकी महाविद्यालयासमोर बोलावले. त्यावेळी दुपारी २.३० वाजता दरम्यान सौरभ त्या ठिकाणी आला असता. आरोपींनी खंडणी मागण्याच्या उद्देशाने त्याच्या डोक्यावर बिअरच्या बॉटलच्या काचाने डोक्यावर मारून गंभीर दुखापत केली. इतकेच नव्हे तर त्याला चारचाकी वाहनात टाकून त्याला गोंदियातून गोरेगाव तालुक्याच्या मांडोबाईपर्यंत नेले. खंडणी मागण्याचा उद्देश होता. अंकीत बिरनवार हा त्याच्या नात्यात असल्याने अपहरण करतांना सौरभने आपल्याला ओळखले त्यामुळे त्याचा खून करणे आवश्यक असल्याचे ठरवून अंकीतने इतर आरोपींच्या मदतीने त्याचा खून करण्याचा चंग बांधला. १५ डिसेंबर रोजी दुपारी २.३० वाजता त्याच्या डोक्यावर काचेच्या बॉटलने मारून तो रक्ताच्या थारोळ्यात तडफडत राहीला. रात्री १२ वाजतापर्यंत त्यांनी त्याला तडफडत ठेवले. तरीही तो जिवंत असल्याचे पाहून कामठा जवळील एका गावातील पुलाखाली नेऊन त्याचा गळा दाबून खून करण्यात आला.पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने पुन्हा त्याचा मृतदेह वाघनदीच्या पात्रात टाकण्यात आले. वाघनदीच्या पात्रात मृतदेह टाकतांना त्याच्या मृतदेहाला दगड बांधण्यात आले होते. यासंदर्भात रामनगर पोलिसांनी भादंविच्या कलम ३०२, ३६३, ३६६, २०१ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपी अंकीत राधेश्याम बिरनवार (२१) रा. कमरगाव (गोरेगाव), राजू मारबते (२१) गजेंद्र मारबते (१९) व चित्तेश्वर बिसेन (२१) रा. बटाणा अश्या चार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. तपास पोलीस निरीक्षक प्रदीप घोंगे करीत आहेत.  आरोपी वाढण्याची शक्यताया खंडणी प्रकरणात सहकार्य करणाऱ्या आरोपींची संख्या अधिक आहे. पोलिसांनी सद्या चारच जणांना अटक केली आहे. परंतु त्याला सोडून देणारा, आरोपींना मदत करणारे लोक अद्याप अटक झाले नाहीत.यासंदर्भात सद्या पोलिसांनी तपासाच्या नावार अधिक माहिती देण्यास टाळाटाळ केली. परंतु याप्रकरणातील आरोपींची संख्या वाढण्याची दाट शक्यता आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखून