शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

श्री छत्रपती शिवाजी एज्युकेशनचे माजी खजिनदार देशमुख यांना अटक, वैद्यकीय प्रवेशाचे आमिष दाखवत २९ कोटी उकळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2022 07:43 IST

Crime News: सुमारे ३५० विद्यार्थ्यांना वैद्यकीय प्रवेशाचे आमिष दाखवत त्यांच्याकडून रोखीने अवैधरीत्या २९ कोटी रुपये घेतल्याप्रकरणी कोल्हापूरस्थित श्री छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटीचे माजी खजिनदार अप्पासाहेब रामचंद्र देशमुख यांना शुक्रवारी मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली ईडीने (सक्तवसुली संचालनालय) अटक केली.

मुंबई : सुमारे ३५० विद्यार्थ्यांना वैद्यकीय प्रवेशाचे आमिष दाखवत त्यांच्याकडून रोखीने अवैधरीत्या २९ कोटी रुपये घेतल्याप्रकरणी कोल्हापूरस्थित श्री छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटीचे माजी खजिनदार अप्पासाहेब रामचंद्र देशमुख यांना शुक्रवारी मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली ईडीने (सक्तवसुली संचालनालय) अटक केली. त्यानंतर त्यांना विशेष न्यायालयात हजर करण्यात आले.

२४ जूनपर्यंत त्यांची रवानगी ईडीच्या कस्टडीमध्ये करण्यात आली आहे. या प्रकरणी मे महिन्यात अप्पासाहेब देशमुख यांचे बंधू आणि संस्थेचे माजी अध्यक्ष महादेव देशमुख यांनादेखील ईडीने अटक केली असून ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. उपलब्ध माहितीनुसार, २०११ ते २०१६ या कालावधीमध्ये अप्पासाहेब देशमुख हे श्री छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटीचे खजिनदार होते. देशमुख यांनी त्यांचे बंधू आणि संस्थेचे माजी अध्यक्ष महादेव रामचंद्र देशमुख यांच्याशी संगनमत करून संस्थेच्या इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स या वैद्यकीय महाविद्यालयात विद्यार्थ्यांना प्रवेशाचे आमिष दाखवले. हे करताना या दोघांनी ३५० विद्यार्थ्यांकडून २९ कोटी रुपये रोखीने गोळा केले.

पैसे घेऊनही विद्यार्थ्यांना संस्थेत प्रवेश दिला नव्हता. तसेच, जमा झालेल्या पैशांचा स्त्रोत लपविण्यासाठीच हे पैसे त्यांनी रोखीने गोळा केले आणि कालांतराने हे पैसे अप्पासाहेब देशमुख आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या बँक खात्यात जमा केले, असा ठपकाही ईडीने ठेवला आहे. या प्रकरणी सातारा जिल्ह्यातील वडूज पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला होता. यानंतर आर्थिक फसवणुकीची व्याप्ती लक्षात आल्यानंतर हा तपास ईडीकडे देण्यात आला. 

प्रवेशाविना पैसे घेतले- श्री छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटीला २०१२-१३ आणि सन २०१३-१४  या दोन वर्षांसाठी वैद्यकीय महाविद्यालय चालविण्याची अनुमती मिळाली होती. १०० वैद्यकीय जागांना मान्यता देण्यात आली. - ८५ जागा या सरकारी कोट्यातून तर उर्वरित १५ जागा व्यवस्थापन कोट्यातून भरण्यास अनुमती होती. -२०१४ मध्ये पुढील वर्षासाठी वैद्यकीय महाविद्यालय चालविण्यासाठी संस्थेला अनुमती दिली नाही. मात्र, तरीही प्रवेशासाठी विद्यार्थ्यांकडून कोट्यवधी रुपये उकळून त्यांना प्रवेशही न दिल्यामुळे तपास सुरू आहे.

टॅग्स :ArrestअटकCrime Newsगुन्हेगारीEducation Sectorशिक्षण क्षेत्र