शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

विनयभंगप्रकरणी माजी पोलीस अधिकाऱ्यासह दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2020 17:59 IST

‘मुंबई शाहीनबाग’च्या ठिकाणी आंदोलकांशी वादावादी

ठळक मुद्देसध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दिल्लीतील शाहीन बाग आंदोलन ३१ मार्चपर्यंत स्थगित ठेवण्यात आले आहे.महिला आंदोलन स्थगित करण्याच्या पवित्र्यात असताना पठाण यांनी शुक्रवारी रात्री त्याठिकाणी जावून आंदोलन मागे घेवू नये, असा आग्रह करु लागले, त्यातून त्यांच्याबरोबर वादावादी झाली.

मुंबई : मुंबईतील माजी सहाय्यक पोलीस आयुक्त व वंचित आघाडीचे नेते समशेर खान पठाण यांना त्याच्या एका सहकाऱ्यासह नागपाडा पोलिसांनी शनिवारी अटक केली. नागपाडा येथे सुरु असलेल्या मुंबई शाहीनबाग आंदोलनाच्या ठिकाणी एका महिला आंदोलकांशी हुज्जत घालून लज्जास्पद वर्तन केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. शुक्रवारी रात्री उशिरापर्यत हा वाद सुरु होता.

दरम्यान, आपल्यावर राजकीय द्वेषातून तक्रार करण्यात आल्याचा आरोप पठाण यांनी केला आहे. सुमारे ७ वर्षापूर्वी खात्यातून निवृत्त झालेल्या पठाण यांनी अवामी लीग या राजकीय पक्षाची स्थापना केली असून गेल्यावर्षी झालेल्या विधानसभा निवडणूकीत त्यांनी वंचित आघाडीच्यावतीने मुंबादेवी येथून निवडणूक लढविली होती. सीएए, एनआरसी विरोधात मुंबईत नागपाडा येथील मोरलॅड रोड येथे सुरु असलेल्या महिलांच्या आंदोलनाला त्यांनी पांठिबा दिला होता. मात्र सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दिल्लीतील शाहीन बाग आंदोलन ३१ मार्चपर्यंत स्थगित ठेवण्यात आले आहे. त्यामुळे मुंबईतील आंदोलनही स्थगित करावे, असा विचार आंदोलनकर्त्यांनी केला होता, त्याला काहींचा विरोध होता.

महिला आंदोलन स्थगित करण्याच्या पवित्र्यात असताना पठाण यांनी शुक्रवारी रात्री त्याठिकाणी जावून आंदोलन मागे घेवू नये, असा आग्रह करु लागले, त्यातून त्यांच्याबरोबर वादावादी झाली. त्यावेळी कार्यकर्त्यामध्ये धक्काबुक्की झाली, पोलिसांनी हस्तक्षेप करुन वाद मिटविला. मात्र एका महिलेने पठाण यांनी मनात लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करीत आपल्याला धक्काबुकी करुन ठार मारण्याची धमकी दिल्याची तक्रार शनिवारी नागपाडा पोलीस ठाण्यात केली. त्यानुसार पठाण , फय्याज अहमद व अन्य तिघाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. पठाण व अहमद यांना अटक केली असून इतरांचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :MolestationविनयभंगPoliceपोलिसArrestअटकMumbaiमुंबई