शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा नवा निर्णय; भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
5
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
6
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
7
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
8
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
9
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
10
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
11
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
12
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
13
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
14
ठाण्यातील अवजड वाहन बंदीचा ताप! मुंबई अहमदाबाद महामार्गावर देखील अवजड वाहनांना बंदी
15
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
16
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
17
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
18
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
19
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
20
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत

अल्पवयीन मुलीवरील बलात्काराप्रकरणी माजी आमदाराला 25 वर्षांचा तुरुंगवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2021 22:10 IST

25 वर्षांच्या तुरुंगवासासह कोर्टानं आमदारावर 15 लाखांचा दंडही ठोठावला आहे.

शिलाँग: मेघालयचा माजी आमदार ज्युलियस डोरफांगला अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी री-भोई जिल्ह्यातील एका विशेष न्यायालयानं 25 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. ज्युलियस डॉरफांग आमदार असतानाची ही घटना आहे. विशेष न्यायालयाचे न्यायमूर्ती  फॅब्रोनियस सिल्कम संगमा यांनी डोरफांगला 15 लाख रुपयांचा दंडही ठोठावला. डोरफांग HNLC या कट्टरतावादी गटाचा संस्थापक अध्यक्ष देखील आहे.

इतर तीन जणांना शिक्षा

माजी आमदार ज्युलियस डोरफांग यांने 2007 मध्ये एचएनएलसीचे अध्यक्ष म्हणून शरणागती पत्करली आणि 2013 मध्ये मावाठी मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक जिंकली. न्यायालयानं 13 ऑगस्ट रोजी डोरफांगला दोषी ठरवत 17 ऑगस्टला त्याला शिक्षा सुनावली. याप्रकरणात न्यायालयानं आणखी तीन जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. डेरिशा मैरी खारबामोन, मामोनी परवीन आणि तिचा पती संदीप बिस्ववर पीडित तरुणीला गुन्हेगारी क्षेत्रात ओढणे आणि बळजबरीनं वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडल्याचा आरोप आहे.

2016 मध्ये अटक करण्यात आली

डॉर्फांगचे वकील किशोर सी. गौतम म्हणाले की, या निर्णयाविरोधात ते मेघालय उच्च न्यायालयात धाव घेणार आहेत. डोरफांगला डिसेंबर 2016 मध्ये पूर्व खासी हिल्स जिल्हा पोलिसांनी राज्य बाल अधिकार संरक्षण आयोग (एससीपीसीआर) कडून दाखल तक्रारीच्या आधारावर अटक केली होती. त्यानंतर जानेवारी 2017 मध्ये एससीपीसीआरनं री-भोई येथे दुसरी तक्रार दाखल केली होती, ज्यात डोरफांगनं जिल्ह्यातील एका रिसॉर्टमध्ये एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप होता. या तक्रारींच्या आधारे डोरफांगविरुद्ध दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले होते. यादरम्यान काही काळ तो बेपत्ताही झाला होता. पण, 7 जानेवारी रोजी शेजारील आसाम राज्यातील एका बस टर्मिनलवरुन त्याला अटक करण्यात आली. 

टॅग्स :MLAआमदारCrime Newsगुन्हेगारी