शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

भाजपच्या माजी नगरसेविकाला पतीची मारहाण; अनैतिक संबंधांबाबत जाब विचारल्याने छळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2023 07:46 IST

पतीविराेधात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कमीरा रोड : अनैतिक संबंधांबाबत जाब विचारणाऱ्या भाईंदर पूर्वेतील भाजपच्या माजी नगरसेविका मेघना रावल यांना मारहाण, शिवीगाळ करून भाजपचा कार्यकर्ता असलेला पती दीपक रावल याने काेंडून ठेवल्याचा प्रकार उघड झाला आहे. मेघना यांच्या तक्रारीवरून शुक्रवारी पाेलिसांनी दीपक याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. 

मेघना या नगरसेविका असताना २०२० मध्ये पती दीपक यांचे एका तरुणीशी फोनवर सतत बोलणे सुरू असल्याचे त्यांना आढळले. त्यामुळे त्यांनी दीपक यांचा मोबाइल तपासला असता, त्यात तरुणीचे अश्लील फोटो दिसले. त्याबाबत त्यांनी जाब विचारताच दीपक यांनी त्यांना शिवीगाळ व मारहाण केली. हा प्रकार सतत सुरू हाेता.  मेघना यांना पती कोणत्याही कार्यक्रमासाठी जाऊ देत नव्हता व दमदाटी करत होता. २३ फेब्रुवारीला रात्री १० वाजेच्या सुमारास दीपक घरी आले व त्यांनी मेघना यांच्याकडे मिसळ बनवून मागितली.

 घरात त्यासाठी लागणारे फरसाण-चिवडा नसल्याने मेघना यांनी शेजारच्या इमारतीत राहणाऱ्या  नणंद शैला रावल यांना फोन करून त्यांच्याकडे या साहित्याची मागणी केली. त्याचा राग आल्याने दीपक यांनी मेघना यांना मारहाण करून स्वयंपाकघरात काेंडून ठेवले. काही वेळाने शैला या घरी आल्या आणि त्यांनी मेघना यांची सुटका केली. त्यानंतर २४ फेब्रुवारीला पतीविराेधात शिवीगाळ,  मारहाण करून शारीरिक व मानसिक त्रास देत असल्याची तक्रार मेघना यांनी नवघर पोलिसांत दिली. त्यावरून दीपक यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

टॅग्स :BJPभाजपा