शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

भाजपच्या माजी नगरसेवकाला मोक्का अंतर्गत 4 फेब्रुवारीपर्यंत कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2022 18:49 IST

Former BJP corporator in mocca custody :खेमा विरोधात महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात खंडणी, प्राणघातक हल्ला यासह आठ गुन्हे दाखल आहेत.

कल्याण - भाजपचा माजी नगरसेवक सचिन खेमा याच्यावर मोक्का (महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा) अंतर्गत कारवाई करण्यात आली असून कल्याणच्या विशेष मोकका न्यायालयाने त्याला 4 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. खेमा विरोधात महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात खंडणी, प्राणघातक हल्ला यासह आठ गुन्हे दाखल आहेत.

खेमा याने कल्याणमधील भूषण जाधव याला शिवसेनेचे पदाधिकारी अरविंद मोरे यांच्याबरोबर  फिरतो म्हणून जीवे मारण्याची धमकी देत मारहाण केल्याची घटना 3 जानेवारीला रात्री 11.30 ला घडली होती. याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात खेमाविरोधात गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान या प्रकरणातील साक्षीदार असलेले व्यापारी अमजद सय्यद याला धंदा चालू ठेवायचा असेलतर पाच लाख रूपये दे अशी खंडणीची धमकी देत त्याच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना 5 जानेवारीच्या पहाटे घडली होती. यात खेमासह पाच जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. या दोन्ही गुन्हयांप्रकरणी खेमासह अन्य एकाला पोलिसांनी अटक केली होती. तो न्यायालयीन कोठडीत होता. दरम्यान त्याच्यावर दाखल असलेले गुन्हे आणि वाढती गुन्हेगारी पाहता त्याच्यावर मोकका अंतर्गत कारवाई प्रस्तावित केली होती. यासंदर्भातला अहवाल पोलिस महासंचालकांकडे पाठविण्यात आला होता. त्याला मान्यता मिळाली.

सतर्क प्रवाशामुळे लुटारू गजाआड, एक्सप्रेसमध्ये बॅग हिसकवणाऱ्या पाच जणांना अटक

भाजपला धक्कादरम्यान खेमा च्या सुटकेसाठी भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून प्रयत्न सुरू होते. खेमा सह अन्य दोन नगरसेवकांना सत्ताधारी शिवसेनेने जाणीवपूर्वक अडकवल्याचा आरोप करीत भाजपने राज्य सरकारविरोधात शनिवारी अप्पर पोलिस आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला होता. परंतू पोलिसांनी परवानगी नाकारल्याचे कारण पुढे करीत मोर्चा रद्द करण्यात आला. खेमा विरोधात मोक्का अंतर्गत झालेली कारवाई आगामी मनपा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला ‘दे धकका’ असल्याचे बोलले जात आहे. या कारवाईमुळे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले नगरसेवक आणि पदाधिका-यांचे धाबे दणाणल्याची चर्चा देखील जोरदार सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकMCOCA ACTमकोका कायदा