लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : खंडणीच्या गुन्हामध्ये सीआयडीला शरण आलेल्या वाल्मिक कराड याने दुस०या पत्नीच्या नावे पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज रोडवरील एका इमारतीमध्ये दोन ऑफिस घेतले आहे. या मालमत्तेप्रकरणी भाजपचे माजी नगरसेवक दत्ता खाडे यांची बीड जिल्हयातील केज येथे सीआयडीने चौकशी केली आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणांचा मास्टरमाइंड वाल्मिक कराड असल्याचा आरोप सातत्याने केला जात आहे. त्यातच एका खंडणीच्या गुन्हामध्ये सीआयडीला शरण आलेल्या
वाल्मिक कराडचे पुण्यातील कॉलेज रोडवरील एका इमारतीमध्ये दोन ऑफिस दुसरी पत्नीच्या नावे आहेत. हा व्यवहार भाजपचे माजी -नगरसेवक दत्ता खाडे यांच्या मध्यस्थीने झाल्याचा सीआयडीला संशय आहे.वाल्मिक कराड याने पुण्यामध्ये देखील बेनामी संपत्ती जमवल्या असल्याचा सीआयडीला संशय आहे. त्याच अनुषंगाने पुण्यातील भाजपचे माजी नगरसेवक दत्ता खाडे यांची केज येथे सीआयडीकडून चौकशी करण्यात आली.
पुण्यात कोटयावधी रूपयांची संपत्ती
पुण्याच्या फर्ग्युसन रोडवर वाल्मिक कराड याने दुस०या पत्नीच्या नावे ऑफिस विकत घेतले आहेत. हडपसरमध्ये कोटयावधी रूपये किमंतीच्या सदनिकाही कराड याने विकत घेतल्या आहेत. पिंपरी चिचंवडमध्येही कराड यांच्या कोटयावधी रूपये किंमतीच्या सदनिका आहेत.
बीड जिल्ह्यातील केज येथे मला सीआयडीने चौकशीसाठी बोलविल होते. माझी चौकशी झाली, मी जी काही उत्तर द्यायची आहेत, ती दिली आहेत. समाधानकारक उत्तरे मी दिली आहेत. माझे आणि गोपीनाथ मुंडे यांचे संबंध होते, तेव्हा माझी कराडशी तोंड ओळख आहे.वाल्मिक कराडशी माझा कोणत्याही प्रकरणात संबंध नाही. मी सीआयडीला पुर्णपणे सहकार्य केलं आहे .
- दत्ता खाडे, माजी नगरसेवक , पुणे महापालिका